दर्यापूर – महेश बुंदे
गुढीपाडवा या मराठी नववर्षदिनाच्या निमित्याने गोरक्षण स्थळी “गाय पूजन” व तुळशीपूजन करून पर्यावरण सेवेची गाडगेबाबा संदेशगुढी उभारण्यात आली. पर्यावरण समतोल राखण्यासाठी निसर्गाने उपलब्ध करून दिलेल्या सामुग्रीचा उपयोग करून जर मनुष्याने या पृथ्वीवर प्रगती साधण्याचा प्रयत्न केला तर तो निरोगी आरोग्य, सुख, समृद्धी यापासून वंचित राहू शकत नाही या प्रदीर्घ अनुभवाने प्रेरीत या शुभदिनी गाडगेबाबा संदेशातील पर्यावरण सेवेची अभिनव संकल्पना साकारण्यात आली.
दैनंदीन सांडपाणी व्यवस्थापन तथा रेन वॉटर हॉर्वेस्टींग यासह या परीसरात उपलब्ध पाला-पाचोळा व शेणखत मिश्रीत माती पासून कॉम्पोस्ट खताची निर्मिती तसेच गोमूत्र मिश्रीत शेणखतापासून बनविलेली प्रदूषण मुक्त गोवरी ह्या बाबी गो – सेवा कार्यातील लक्षवेधणाऱ्या ठरत आहेत. गाडगेबाबा मंडळाचे अध्यक्ष प्रा. गजानन भारसाकळे यांनी जुन्या रुढीला तिलांजली देत कडू निंबांच्या व आंब्यांच्या झाडाची पाने तसेच परंपरागत गोड गाठी ऐवजी स्वतः बनविलेल्या गाईच्या शेणाच्या सात गोवऱ्यांचा हार या साहित्याची गुढी उभारून या अभिनव संकल्पनेला मूर्त रूप दिले.

गोरक्षण परीसर या घटनेचा साथीदार ठरला. या शुभदिनी गोरक्षण स्थळी टॅक्टर ट्रालीवर खत वाहतूक करणाऱ्या आदिवासी मजूर बांधवांना मिष्ठान प्रसादाचे भोजन तथा गोरक्षण मधील गायींना ढेप – धान्यचूरी या अन्नाचा अलप सायंकाळी दिल्या गेले. प्रा. गजानन भारसाकळे यांच्या मार्गदर्शनात गोरक्षणचे संचालक उमेश इंगळे यांनी दैनंदीन गो-सेवक नामदेवराव गुडधे व वासुदेवराव गुडधे (माहुली – धांडे ) यांचे सहकार्याने या सेवेत कृती योगदान दिले.
