दर्यापूर – महेश बुंदे
अंतराळ खूप रहस्यमयी आहे. परंतु हे खरे आहे की तिथून आपल्याला बऱ्याचदा सुंदर आणि आश्चर्यकारक दृश्ये पाहायला मिळतात. आताच काही तासा अगोदर आपल्याला पृथ्वीवरील आकाशातील आतिषबाजीचे दृश्य पाहायला मिळाले.

ते म्हणजे धूमकेतू उल्कापात यालाच दूरवरून येणारे प्रवासी असे म्हणतात आहेत. ते आकाशातील पाहुणे आहेत, जेव्हा आकाशातून चमकणारे धूमकेतू पृथ्वीच्या बाजूने येतील तेव्हा हे एक अतिशय सुंदर दृश्य असेल. आपण ते दुर्बिणीशिवाय उघड्या डोळ्यांनी पाहू शकता, हा नजारा एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला.

धूमकेतू ,तारा, उल्का, सध्या जगभरातील आकाशप्रेमींच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे. सोशल मिडीयावरही आकाशातील या पाहुण्याचे फोटोग्राफ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आकाश निरभ्र असल्यास भारतातील आकाशप्रेमींना दोन शेपट्यांची छायाचित्रेही घेता येऊ शकतील. धूमकेतूच्या शेपटीतून अवकाशात मुक्त झालेले धूलिकण जेव्हा पृथ्वीच्या वातावरणात शिरतात तेव्हा आपल्याला उल्का पाहायला मिळतात.

