आमदार बळवंत वानखडे यांच्या यशस्वी मध्यस्थीने फेरी वाल्यावरील संकट पुढील आदेशापर्यंत टळले, दर्यापूर पालिकेने फेरीवाल्यांवर आज पासून सुरु केला होता लोकल टॅक्स

दर्यापूर – महेश बुंदे

नगरपालिकेने दर्यापूर बनोसा बाबळी या भागात असणाऱ्या फुटपाथवरील व्यवसायिक व फेरीवाले यांचेवर रोज पट्टी रोज पट्टी म्हणजे लोकल टॅक्स लावण्याचा निर्णय आजपासून जाहीर केला होता या संबंधात गावातील नागरिकांना सुचित करीत दर्यापूर नगरपालिकेने निविदा प्रक्रिया सुद्धा मंजूर केली होती.

दर्यापूर येथील एका कंत्राटदाराला ही रक्कम गोळा करण्याचे कंत्राट सुद्धा देण्यात आले होते, यावरून दर्यापूर शहरांमध्ये असणाऱ्या फेरीवाले व फुटपाथवरील व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान यासह मागील दोन वर्षात कोविड काळातील नुकसान आदी बाबींचा विचार करत दर्यापूर येथील आमदार बळवंत वानखडे, सुधाकर भारसाकळे व बाळासाहेब हिंगणीकर यांनी तातडीने दखल घेत दर्यापूर पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून वरील निर्णय या संबंधात फेरविचार करण्याचे व नियमानुसार हा निर्णय स्थगित करण्याचे पत्र दिले.

दर्यापूर नगरपालिके क्षेत्रामध्ये जवळपास तीन हजाराच्या वर फुटपाथवरील व्यवसाय व फेरीवाले छोटे व्यवसाय करीत आपला उदरनिर्वाह चालवतात यांचेकडून प्रति दिन दहा रुपये प्रमाणे रोज पट्टी घेण्याचे निर्णय जाहीर झाले होते, या संबंधात काही व्यवसायिकांनी आमदार बळवंत वानखडे यांचे समोर ही बाब मांडली, दिवसेंदिवस होणारे व्यवसायातील नुकसान तथा पुढील काळात येणारा पावसाळा हा फुटपाथवरील व्यवसाय इतका फेरीवाले यांना आर्थिक विवंचनेत आणणारा असतो

अशा काळात दररोज नगरपालिकेला टॅक्स स्वरूपात रक्कम देणे कठीण जाणार आहे, नगरपालिकेने या संबंधात निविदा प्रक्रिया करून कंत्राटदार सुद्धा नेमला होता या नुसार आज आमदार बळवंत वानखडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे तथा जिल्हा परिषदेचे वित्त व आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर, एडवोकेट अभिजीत देवके, सुनील पाटील गावंडे, नगरसेवक अनिल बागडे यांच्यासह पालिका कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थिती देत पालिका प्रशासन तथा मुख्याधिकारी यांना वरील निर्णय स्थगित करावा असे पत्र दिले आहे, आमदार वानखडे यांनी दिलेल्या पत्रानुसार दर्यापूर पालिकेने फेरीवाल्यांचा वरील टॅक्स तात्पुरता स्थगित करत पुढील आदेशापर्यंत थांबलेला आहे, आमदार वानखेडे यांच्या प्रयत्नाने फेरीवाल्यांवर आलेले आर्थिक संकट तूर्तास टळले आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!