अडुळा बाजार येथील शेतकरी सुनील बोंडे नैसर्गिक आपत्तीने त्रस्त, गयाटी नाल्यामुळे झाले शेतीचा दोन भाग,दरवर्षी लाखोंचे नुकसान,आमदार साहेबांनी लक्ष देण्याची मागणी

दर्यापूर – महेश बुंदे

तालुक्यातील अडुळा बाजार येथील शेतकरी सुनील बोंडे गेल्या अनेक गेल्या अनेक वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीने त्रस्त असून त्याच्या शेताचे गयाटी नाल्यामुळे दोन भाग झाले असून, दरवर्षी लाखोंचे नुकसान होत आहे, तरी या समस्याकडे आमदार बळवंत वानखडे यांनी लक्ष द्यागे, अशी मागणी करण्यात आली आहे. गेल्या तीन ते चार वर्षे अगोदर नदी लगत असलेल्या शेतामध्ये नदीच्या पुरामुळे नदीचे पात्र शेतात पसरत असल्याने परिसरातील शेतकरी सुनील पाटील बोंडे यांची शेतीचा मोठा भाग ढासळलेल्यामुळे शेतीचा मोठा भाग कोसळला आहे.

शेतकरी


त्याच प्रमाणे यावर्षी सुद्धा हरभरा पेरणी शेती ढासळेल या भीतीने हरभरा सोंगता आला नाही व जमीन जवळ जवळ पाव एकर परिसर मध्ये मोठमोठ्या भेगा पडून काही शेतीचा भाग हा दबला गेला व पुन्हा चार वर्षाच्या सारखी परिस्थिती येते की काय, असे चित्र दिसून आले. दरवर्षी नदीच्या पात्रामुळे शेती कमी होत आहे,ही वस्तुस्थिती सुनील पाटील बोंडे यांनी आमदार बळवंत वानखडे यांच्या संपर्क कार्यालयात येऊन यावर उपाय करण्याचे साकडे आमदार साहेबांकडे यांना घातले.


मात्र अगोदरही तक्रार करू करूनही पटवारी किंवा तहसीलदार यांपैकी कोणीही सर्वे केला नाही, अशी त्यांनी आमदार यांना सांगितले. एवढेच नाही तर माजी जिल्हा परिषद आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणेकर यांनासुद्धा यांनासुद्धा सांगितले होते. तेव्हा शासनाने शेतीचा सर्वे करून मला योग्य तो मोबदला द्यावा, अशीही मागणी सुनील पाटील बोंडे यांनी आमदार बळवंत वानखडे यांच्याकडे मागणी केली आहे किंवा परिसरामध्ये संरक्षण भिंत उभारून आमच्या शेतीला संरक्षण द्यावे असे त्यांनी सांगितले.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!