मोशी वार्ता – पुणे जिल्ह्यातील मोशी, बो-हाडेवाडी परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या २० वर्षांपासून आळंदी पोस्ट ऑफिसची सुविधा वापरावी लागत होती. वारंवार मागणी करूनही मोशीला स्वतंत्ररित्या पिनकोड नसल्यामुळे आणि अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, आता या त्रासापासून नागरिकांची सुटका झाली आहे. मोशी पोस्ट ऑफिस सुरू झाल्यामुळे नागरिकांना सुविधा उपलब्ध होणार आहे.
मोशी परिसरासाठी स्वतंत्र विद्या शहरी भागाशी जोडलेले पोस्ट कार्यालय आजपासून कार्यान्वित झाले आहे. त्याचे लोकार्पण पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका सारिका बो-हाडे, निर्देशक डाक सेवा सिमरन कौर, पुणे शहर पूर्व विभाग प्रवर अधीक्षक डाकघर गोपराजू सतीश, चिंचवड सुपर टाक निरीक्षक सी. एम. नदाफ, पोस्ट मास्तर जनरल पुणे रिजन मधुमिता दास, जनसंपर्क निरीक्षक के एस पारखी, यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.
