खा. अमोल कोल्हे समाजामध्ये घडणाऱ्या सर्व गोष्टी,फार बारकाईने पाहत असतात.

पुणे :- वेळोवेळी ते याबाबत प्रत्यक्ष भेटून तर कधी आपल्या फेसबुक अकाउंटवरून कौतुकही करताना दिसतात. मग त्यात बैल गाड्यासमोर घोडी वर बसणारे सत्तर वर्षांचे खेड तालुक्यातील मधूनाना सातपुते असतील किंवा मोठ्या हिंमतीने बैल गाडा जुंपणारी जुन्नर तालुक्यातील रणरागिणी दिक्षा पारवे असेल… चांगल्या गोष्टींचं कौतुक खासदार कोल्हे आवर्जून करताना दिसतात… आंबेठाण येथे जवळ जवळ तीन तास चाललेल्या या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये बापूसाहेब सोनवणे, शांताराम गाडे, सचिन भोपे, विक्रांत चौधरी, प्रशांत अष्टेकर, मयुर, श्रीकांत साळुंके व हितेश घुगरे इ. रेस्क्युअर्सनी सहभाग घेतला होता. या सर्वांनी आतापर्यंत बऱ्याच प्राण्यांना सुखरूप रेस्क्यू केले आहे. बापूसाहेब सोनवणे आणि शांताराम गाडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह त्या कुत्र्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढले, त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून या रेस्क्यू टिमचे कौतुक केले जात आहे.


स्वराज्य वार्ता ची न्यूज: कुत्र्याचा जीव वाचवण्यासाठी, शंभर फूट खोल विहिरीत उतरणाऱ्या रेस्क्यू

टीमसह प्राणी मित्रांचे खा. अमोल कोल्हेंकडून कौतुक; स्वतःच्या फेसबुक अकाउंटवरून पोस्ट केला रेस्क्यू

आंबेठाण (चाकण ता. खेड) येथे गेले दोन दिवस विहिरीत पडलेल्या कुत्र्याला नेचर गार्ड ऑर्गनायझेशन व चाकण फॉरेस्ट रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी जीवदान दिल्याची माहिती वर्तमानपत्र, व्हिडिओ न्यूज व सोशल मीडियाच्या माध्यमांतून सर्वत्र झळकली. शिरूर लोकसभा मतदार संघाचे खा. डॉ. अमोल कोल्हे यांनीही या बातमीची दखल घेत कुत्र्याचा जीव वाचवण्यासाठी शंभर फूट खोल विहिरीत उतरणाऱ्या रेस्क्यू टीमचे मनभरून कौतुक केले आहे. माणुसकी हरवत चाललेल्या या जगात कुठेतरी चांगली माणसं शिल्लक आहेत म्हणून आजही माणसांसोबत जनावरांच्या जीवासाठी आपल्या जीवाचीही पर्वा न करणारी माणसं अशी सत्कर्म करतांना आपल्याला पहायला मिळतात. खरं तर यापूर्वीही बापूसाहेब सोनवणे यांच्यासह त्यांच्या सर्व टीमने उदमांजर असेल, अजगर
असेल, साप असतील, जखमी पक्षी असतील यांना जीवदान दिले आहे. कुत्र्याला खोल विहिरीतून रेस्क्यू केल्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर

खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी या रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडिओ आपल्या फेसबुक अकाउंटवरून पोस्ट करीत असं म्हटलय की,

“मराठी मातीतली संतांनी दिलेली भूतदयेची शिकवण प्रत्यक्षात उतरवण्याचं खूप मोठं काम नेचर गार्ड ऑर्गनाझेशन फाउंडेशन व चाकण चाकण फॉरेस्ट रेस्क्यू टीम करतेय ! एका छोट्या कुत्र्याचा जीव वाचविण्यासाठी शंभर फूट खोल विहिरीत उतरण्याचं धाडस करणाऱ्या या टीमचं मनापासून कौतुक आहे. सर्वांना माझ्या शुभेच्छा!”

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!