परभणी जिल्हयातील गंगाखेड येथील वाळुच्या ठेक्याचे कारणावरून झालेल्या खुनाच्या गुन्हयातील मुख्य आरोपींना चाकण पोलीसांकडुन अटक

पुणे वार्ता:-दिनांक २४/०३/२०२२ रोजी परभणी जिल्हयातील गंगाखेड येथे वाळुच्या ठेक्याची वान्दु अवैधरित्या वाहतुक करण्याचे कारणा वरून वाद होवुन माधव त्रंबकराव शिंदे रा. रावराजापुर ता. पालम जि. परभणी याचा आरोपी नामे प्रकाश प्रभाकर डोंगरे, रा. थनेवाडी ता. पालम जि. परभणी याने व त्याचे सहकारी यांनी मिळुन बेकायदेशिर जमाव जमवुन खुन केलेला होता. सदर प्रकाश बाबत गंगाखेड पोलीस स्टेशन गुरनं १०९/२०२२ भादवि कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९ १८८ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर खुनाचे प्रकरण सपुर्ण महाराष्ट्रभर गाजलेले होते.

चाकण पोलीस स्टेशन कडील डि. बी. पथकाचे अधिकारी व अंमलदार हे चाकण पोलीस स्टेशन गुरनं ४५१/२०२२ भादवि कलम ३९२, ३४ या गुन्हयातील आरोपींचे शोधकामी हॉटेल लॉजीग चेक करीत असतांना हॉटेल ड्रिम लॅन्ड येथे दोन इसम राहत असल्याचे निदर्शनास आले. व ते परभणी येथील रहीवासी असल्याचे माहिती मिळाली त्यावरून त्यांचे नाव पत्ते विचारले असता त्यांची नावे १) प्रकाश प्रभाकर डोंगरे वय ३३ वर्षे, रा. धनेवाडी ता. खेड जि. पुणे, २) राजेश सुभाषराव बोबडे वय ४३ वर्षे रा. गोपा ता. गंगाखेड जि. परभणी अशी सांगीतली. सदर इसमांना चेक करीत असतांना त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे त्यांचेकडे कसुन चौकशी केली असता ते गंगाखेड पोलीस स्टेशन कडील वरील नमुद गुन्हा केल्यानंतर चाकण येथे पळुन आलेले असल्याचे समोर आलेले असुन सदर गुन्हयात ते मुख्य आरोपी असल्याचे चौकशीमध्ये समोर आल्याने वरील दोन्ही आरोपींना ताब्यात घेवून गंगाखेड पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा परभणी यांना आरोपी ताब्यात घेतले बाबत माहिती देवून सदर आरोपींना पुढील तपासकामी स्थानिक गुन्हे शाखा परभणी यांचे ताब्यात दिलेले आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश साहेब, अपर पोलीस आयुक्त श्री. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- १ श्री. मंचक इप्पर, सहा. पोलीस आयुक्त, प्रेरणा कट्टे यांचे सुचना व मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, पोलीस निरीक्षक अनिल देवडे, सपोनि प्रसंन्न ज-हाड, सपोनि विक्रम गायकवाड, पोहवा संदिप सोनवणे, पोना हनुमंत कांबळे, भैरोबा यादव, मच्छिंद्र भांबुरे, पोका प्रदिप राळे, नितीन गुंजाळ यांनी केलेली आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!