दर्यापूर – महेश बुंदे
दर्यापूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामगड येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत असणारे तालुक्यातील तोंगलाबाद येथील रहिवासी श्री रमेशराव जगदेवराव जऊळकार हे आज दि.31 मार्च रोजी वयानुसार सेवानिवृत्त झाले.

त्याना निरोप देण्यासाठी रामागड येथील ग्रामपंचायत कार्यालय व शाळा व्यवस्थापन समिती आणि गावकरी मंडळींच्या वतीने आयोजित सेवापूर्ती सत्कार सोहळ्याला गावातील नागरिक,विद्यार्थी व पालक यांची मोठ्या संख्येने असणारी उपस्थिती श्री रामेशराव जऊळकार यांच्या कार्याची पावती देऊन गेली.
