आराळा येथे शासनाचा जीआर असतानाही तलावातून माती उचलण्यास स्वार्थासाठी विरोध

दर्यापूर – महेश बुंदे

जलस्तर वाढवण्यासाठी शासन प्रत्येक ठिकाणी गाव तलाव, ब्रिटिश कालीन तलाव, शिवतलाव अशा सर्व तलावांचे खोलीकरण लोकसहभागातून ल करण्याचे शासनाने ठरवले आहे.


तर दुसरीकडे तालुक्यातील आराळा ग्रामपंचायत सरपंच यांनी पंधरा दिवसा अगोदर माती उचलण्याचा शुभारंभ पूजन स्वतः केले. पण स स्वार्थासाठी त्यानी पंधरा दिवस माती तलावातून उचलण्याचे काम करीत असलेल्या शेतकरी बंधूना अचानक काम बंद करा म्हणून सांगितले.

तहसीलदार दर्यापूर यांना पत्र देऊन तलाव फुटला तर जबाबदार कोण ? असा सवाल उपस्थित केला. यामुळे तहसीलदार यांनी काम बंद करण्याची नोटीस दिली त्यामुळे काम बंद झाले. अखेर गावातील पंधरा-सोळा शेतकरी एकत्र येऊन सरपंचाच्या विरोधात तहसीलदार यांच्या दालनात पोहोचले व माती उचलण्यास परवानगी द्यावी,अशी मागणी करू लागले.

त्यांच्यासमवेत माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील पाटील डिके व श्रीमती बारब्दे मॅडम, अतुल पाटील कानोलीकर हेसुद्धा तहसीलदारांच्या दालनात पोहोचले. तलावातील माती उचलण्यास परवानगी द्यावी एकच मागणी घेऊन तहसील मध्ये थांबले अखेर तहसीलदार यांनी संबंधित पाटबंधारे लघुसिंचन विभागातील अभियंत्यास फोन द्वारे चर्चा केली. तलावास भेट देऊन योग्य ते मार्गदर्शन करावे व दोन दिवसात पुन्हा माती उचलण्याचे काम परवानगी दिल्या जाईल,असे सांगितले.तेव्हा ग्रामस्थ शांत झाले. गावात राजकारण सुरू झाले तेही स्वतःच्या स्वार्थापोटी असे मत आरळा ग्रामस्थ यांनी तहसील कार्यालय व्यक्त केले. त्याप्रसंगी आरळा गावातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!