कोकर्डा ग्रामपंचायतीची करवसुलीसाठी अशीही गांधीगिरी

दर्यापूर – महेश बुंदे

कोकर्डा ग्रामपंचायतीच्या वतीने मार्च एन्डमुळे करवसुलीकरीता थकबाकीदाराने आपल्याकडील थकीत बाकी भरण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने अभिनव शक्कल लढविली असून थकबाकीदाराचे आभार व्यक्त करीत वसुली मोहीम हाती घेण्यात आली आहे. या विशेष धडक मोहिमेस थकबाकीदारांकडून मात्र चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

कोकर्डा ग्रामपंचायतीची घरपट्टी, पाणीपुरवठा बाकी, जागा भाडे आदी मोठ्या प्रमाणावर थकीत असून मार्च अखेर असल्याने ग्रामपंचायतीच्या वतीने धडक वसुली मोहीम हाती घेण्यात आली आहे. गावचे सरपंच पुष्पा बारब्दे यांच्या मार्गदर्शनात ग्रामविकास अधिकारी विलास वडतकर, वसुली क्लार्क नंदकिशोर सावरकर, प्रकाश बारब्दे हे गावात वसुली करीत फिरत होते.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!