अपुर्ण कोल्हापुरी बंधा-याचे काम सुरू न केल्यामुळे आमरण ऊपोषणास सुरुवात

प्रतिनिधी फुलचंद भगत


वाशिम:-अपुर्ण राहिलेले लाठी येथील कोल्हापुरी बंधार्‍याचे काम वारंवार निवेदन देवूनही सुरु न केल्यामुळे लाठी येथील लोकप्रतीनीधींनी वाशिम जिल्हापरिषद समोर दि.३१/३/२०२२ पासुन आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.


ग्रामपंचायत लाठी पं.स.मंगरूळपीर अंतर्गत अडान नदीवर कोल्हापुरी बंधा-याचे काम सुरू असतांना दि.७/६/२०२१ रोजी पाऊस आल्यामुळे काम बंद पडले होते.


परंतु आज रोजी त्या बंधा-यावर जाण्या करीता रस्ता खुला आहे व नदीला पाणी सुध्दा कमी आहे.उर्वरीत
राहीलेले अपुर्ण काम त्वरीत पुर्ण करण्यात यावे.असे संदीय पत्रानुसार सबंधित प्रशासनास कळवन्यात आले होते.

तरी सदर काम विहीत मुदती पुर्ण न झाल्यामुळे झालेल्या नुकसानीस संबधीत विभाग व कंत्राटदार जबाबदार धरुन दि.३०/३/२०२२ पर्यंत काम सुरू न केल्यामुळे संबधीत कामा संदर्भात दि.३१/३/२०२२ पासुन मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.वाशिम यांच्या कार्यालय परिसरामध्ये उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे.या ऊपोषणामध्ये मंगरुळपीर तालुक्यातील लाठी गावचे सरपंच ,उपसरपंच व ग्रा.प.सदस्य गण यांनी जि.प.वाशिम कार्यालयासमोर उपोषास सुरुवात केली आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!