पुणे वार्ता :- दि.३०.३.२०२२, चाकण आळंदी, दिघी पोलीस ठाणे येथील अनडिटेक्ट घरफोडीचे एकुण 10 गुन्हे उघड ; पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 3 ची कामगिरी
एकुण 7,80,000/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिणे हस्तगत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हददीत मालमत्ते विषयी गुन्हयांचे प्रमाण वाढल्याने मा. पोलीस आयुक्त सो पिंपरी चिंचवड यांनी सदर गुन्हयांना प्रतिबंध करण्याकरीता गुन्हे शाखेच्या सर्व शाखांना मालत्तेविषयीच्या गुन्हयांना प्रतिबंध करण्याबाबत सुचना दिल्या होत्या.
मा. वरीष्ठांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे गुन्हे शाखा युनिट 3 हददीत घडणारे गुन्हयांना प्रतिबंध करण्याचे अनुशंगाने गुन्हे शाखा युनिट 3. कडील विजय जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक यांना त्यांचे बातमीदारा मार्फत खात्रीशीर माहीती मिळाली की, चाकण, आळंदी, दिघी पोलीस हददीत घरफोडया चो-या करणारा रेकॉर्डवरील आरोपी सचिन उर्फ लंगडया गोरक्षनाथ काळे वय 50 वर्षे, रा. गांधीनगर आंबेडकर झोपडपटटी, कॅटोनमेंट जवळ देहुरोड ता. हवेली जि.पुणे याने युनिट 3 हददीत घरफोडया चो-या केल्याबाबत माहीती मिळाली
सदरचा आरोपी हा म्हाळुंगे चौकी चाकण पोलीस ठाणे येथील घरफोडीच्या गुन्हयामध्ये गेले एक महीन्यापासून येरवडा कारागृहात असले बाबत माहीती मिळाली त्यावेळी मा. वरीष्ठांचे परवानगीने चाकण पोलीस ठाणे गु.र.नं. 1091/2019 भा.दं. वि. कलम 457,380 हा गुन्हा तपासाला घेवून सदर आरोपीस मा.न्यायालयाचे परवानगीने ताब्यात घेवून त्याचेकडे पोलीस कोठडी मध्ये कौशल्यपुर्ण तपास केला असता आरोपीने दाखल गुन्हयाची कबुली देवून इतर काही घरफोडीचे गुन्हे चाकण, दिघी आळंदी भागात केल्याची माहीती दिली.
सदर आरोपीकडून गुन्हे शाखा युनिट 3 कडील वपोनि श्री शंकर बाबर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय जगदाळे व तपास पथकाने एकुण 10 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणुन एकुण 7,80,000/- रुपयेचासोन्याचे दागिणे निवेदन पंचनाम्याने हस्तगत करण्यात आलेला आहे.
उघडकीस आलेले गुन्हे1) चाकण पोलीस ठाणे गु.र.नं. 529/2018 भा.दं.वि. कलम 457,3802) चाकण पोलीस ठाणे गु.र.नं. 1091 / 2019 भा.दं.वि. कलम 457,380 3) चाकण पोलीस ठाणे गु.र.नं. 1201 / 2019 भा.दं.वि. कलम 454,3804) आळंदी पोलीस ठाणे गु.र.नं. 128/2018 भा.दं.वि. कलम 454,457,3805) आळंदी पोलीस ठाणे गु.र.नं. 145/2018 भा.दं. वि. कलम 454,457,3806) आळंदी पोलीस ठाणे गु.र.नं. 299 /2018 भा.दं.वि. कलम 457,3807) आळंदी पोलीस ठाणे गु.र.नं. 19/2019 भा.दं. वि. कलम 454,3808) आळंदी पोलीस ठाणे गु.र.नं. 119/2019 भा.दं.वि. कलम 4543809) आळंदी पोलीस ठाणे गु.र.नं. 157 / 2019 भा.दं. वि. कलम 454,38010) दिघी पोलीस ठाणे गु.र.नं. 319 / 2019 भा.दं.वि. कलम 454,380. नमुद आरोपीची गुन्हे करण्याची कार्यप्रणाली घराचा कडी कोयंडा तोडून प्रवेश करून घरफोडी.करीत असून त्याचेवर यापुर्वीचे 18 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश मा. अपर पोलीस आयुक्त श्री शिंदे, पोलीस उपआयुक्त मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. डॉ. काकासाहेब डोळे, सहा पोलीस आयुक्त (गुन्हे), डॉ. प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर गुन्हे शाखा युनिट 3, पोलीस उपनिरीक्षक विजय जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक गिरीश चामले, यदु आढारी, सचिन मोरे, विठठल सानप, रूपीकेश भोसुरे, अनिल लांडे, महेश भालचिम, सागर जैनक, योगेश्वर कोळेकर, राजकुमार हनमंते, त्रिनयन बाळसराफ, राहुल सुर्यवंशी रामदास मेरगळ, सुधिर दांगट, समीर काळे, शशिकांत नागरे यांनी केली आहे.