प्रतिनिधी ओम मोरे
नांदगाव खंडेश्वर :- २८ , २९ मार्च या दोन दिवसीय संपाला पाठिबा देण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वात तहसिलवर प्रलंबित मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला , 28 तारखेला बस स्टॉप चौकात धरणे आंदोलन करून मुख्याधिकारी यांचेमार्फत मा. प्रधानमंत्री यांना निवेदन पाठविण्यातआले. त्याचबरोबर शिवनी, पापळ, जावरा, या सह तालुक्यातील इतर ग्रामपंचायत सचिवांमार्फत निवेदन पाठविण्यात आले.
केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणामुळे नविन कामगार संहितेचा जन्म झाला . कामगारानी आपल्या लढयाच्या जोरावर मिळवलेले कामगार कायदे मोडुन कामगांराना परत गुलामीच्या काळात ढकलले जात आहे . कामगार संहितेमुळे कामगाराचे जिवन अस्थिर होणार आहे . त्यांचे संपाचे हात्यार हिरावुन घेतले जानार आहे . योजना कर्मचारी अंत्यत तुटपुंच्या मानधनात काम करत आहेत .
