दर्यापूर – महेश बुंदे
केंद्र शासनाच्या ग्राम सडक योजना अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील दर्यापुर तालुक्यातील बाभळी टी पॉईंट वर मागील काही दिवसांपासून रोडचे बांधकाम सुरू आहे, दर्यापूर ते अंजनगाव, दर्यापूर ते आकोट, दर्यापूर ते अकोला या रोड ला जोडणारा बाभळी टी पॉईंटचा काहीसा रोड तयार करण्यात आला नाही, रोडलगत तेथे फार मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजातील लोकांचे घरे आहेत, तयार केलेल्या रोडमुळे त्या रोडवर होणाऱ्या धुळीमुळे मुस्लिम समाजातील लोकांचे आरोग्य तर धोक्यात आलेच आहे परंतु त्यांचे घरे सुध्दा खराब होत आहेत, त्या रोडच्या बांधकामसाठी शिवसेना तालुका प्रमुख गोपाल पाटील अरबट यांनी वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्रव्यवहार केला परंतु त्यावर त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही, त्यामुळे शिवसेना तालुका प्रमुख गोपाल पाटील अरबट यांच्या नेतृत्वाखाली दि. ३० मार्च २०२२ ला बाभळी टी पॉईंटवर चक्का जाम आंदोलन केले.

त्यावेळी तात्पुरता तणाव निर्माण झाला होता, पोलिसांना पाचारण करून त्या आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेण्यात आले, आंदोलन करतेवेळी गोपाल पाटील अरबट, बबन विल्हेकर, सौरभ वायझाडे, प्रतीक राऊत, राहुल भुम्बर, विजय ठाकरे, आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया —
दर्यापूर शहरातील अंजनगाव टी पॉईंट रस्त्याचे बांधकाम गेल्या कित्येक दिवसांपासून रखडलेले आहे, त्यामुळे वाहन चालकांना शेजारी असलेल्या व्यावसायिकांना रस्त्याच्या धुळीमुळे अडचणीचा सामना करावा लागत आहे. संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊन सुद्धा अधिकाऱ्यांनी काम पूर्ण केले नाही त्यामुळे आज शिवसेनेच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले. १४ एप्रिल पर्यंत काम सुरू करण्यात येईल असे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले आहे. त्यामुळे आंदोलन तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे.
गोपाल अरबट
शिवसेना तालुकाप्रमुख दर्यापूर