प्रतिनिधी लहू लांडे
चाकण: मेदनकरवाडी गावातील चौधरी फाटा येथील सोकींन इलेक्ट्रीकल अँड इंजिनिअरिंग वर्क कंपनीमध्ये दुपारी ३ वाजताच्या सुमारास कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन विरेंद्र बनवारी यादव(वय-२८), अक्षय भीमराव केदारी(वय-२७), शिवाजी नीलकंठआप्पा मठपती(वय- ३८) असे तिघे जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यातील दोन व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यातील अक्षय केदारे हा ६० टक्के तर शिवाजी नीलकंठआप्पा मठपती हा ९५ टक्के भाजले असून त्यांना भोसरी येथील हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले आहे.
