प्रतिनिधी रविकांत जाधव
पुणे वार्ता :- संस्थापक बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्षा आद महाउपासिका मिराताई आंबेडकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष आद भीमराव य.आंबेडकर पुणे जिल्हा पश्चिम विभाग
रविवार दिनांक 27 मार्च 2022 रोजी बौद्धांचार्य प्रमाणपत्र परीक्षा जिल्हा शाखेच्या वतीने संपन्न करण्यांत आली असून परीक्षेस जिल्ह्यातून एकूण ६७(सदुसष्ट)परीक्षार्थी बसले होते मुख्य परीक्षेस म्हणून राष्ट्रीय सचिवा आद वैशालिताई आहिरे होत्या तर साहय्यक शिक्षक म्हणून मुंबई कार्यकारणीचे संघटक संतोष मटकर होते.
अतिशय शिस्तबद्ध नियमबद्ध प्रकारे परीक्षेचे कामकाज पार पडले लेखी परिक्षेसह प्रॅक्टीकल , सुट्टपतन, सामान्यज्ञान ,सभाधारिस्ट या सर्वच विषयाचे प्रश्नसुद्धा विचाराण्यांत आले
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्रकाश ओव्हाळ होते तर सूत्रसंचालन सरचिटणीस राधाकांत कांबळे यांनी केले शेवटी आभार संस्कार उपाध्यक्ष दत्तात्रेय गायकवाड यांनी मानले.

कोशाध्यक्ष भीमराव ढोबळे विभागीय सचिव दिलीप सरोदे, पूर्वचे संस्कार उपाध्यक्ष मोहन रोकडे, उपाध्यक्षा सुजाताताई ओव्हाळ संस्कार सचिव दलितानंद थोरात यांनी विशेष सहकार्य केले
मटकर, वैशालिताई राधाकांत कांबळे यांनी शुभेच्छा दिल्या अध्यक्षीय भाषण प्रकाश ओव्हाळ यांनी केल्यानंतर सरणताय होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.




