प्रतिनिधी सुनील बटवाल
चिंबळी दि२९( वार्ताहर) श्री क्षेत्र आळंदी जवळ असलेल्या केळगाव (हनुमानवाडी) ता खेड येथील श्री रघुनाथ महाराजांचा उत्सव २५व २६ रोजी नुकताच विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
रघुनाथ महाराजांच्या उत्साहा निमित्ताने संपुर्ण मंदिराला विद्युत रोषणाई करुन महापुजा अभिषेक हारतुरे मांडव डहाळे पालखी मिरवणूक काढण्यात आली होती तर करमणूकीसाठी रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर व तुकाराम खेडकर सह पांडूरंग मुळे मांजर वाडीकर यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तर मदमस्त अप्सरा व भारुडाचा ही कार्यक्रम ठेवण्यात आला होता .
तर दोन दिवस भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजिन करण्यात आले होते या बैलगाडा शर्यती मध्ये सुमारे ४२७ बैल गाडा मालकांनी सहभाग घेतला होता या बैलगाडा शर्यती साठी ३ लाख ११ हजार १०१ रुपये तर एक चांदीची गदा ४बैलगाडे ३टुव्हिलर ३खोड ५चषक प्रत्येक सहभागी झालेल्या बैलगाडा मालकांना चषक देण्यात आले.

तर शनिवार दि रोजी आयोजित जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत १५०मल्लानी सहभागी होऊन कौशल्य दाखवत उपस्थित मान्यवरांची व कुस्ती शौकीनाची मने बहारून टाकली .
या स्पर्धेत खुल्या गटातील तुषार डुबे यांने रघुनाथ चषक किताबाचा मानकरी ठरला तर योगेश्वर तापकीर उपविजेता राहत प्रेक्षकाची मने जिंकली तर ४६ किलो वजन गटात पृथ्वीराज साबळेने यश मिळवले विजेत्या मल्लांना ग्रामस्थाकडून पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेतील वजननिहाय निकाल पुढीलप्रमाणे
३५किलो वजनगटात सारंग बोराडे (प्रथम क्रमांक ), शर्मन शिंदे (व्दितीय क्रमांक), रूद्रप्रताप साबळे ( तृतीय क्रमांक),४२ किलो वजन गटात (प्रथम क्रमांक ),प्रतिक शिर्के (व्दितीय क्रमांक ),यशराज चोरमले( तृतीय क्रमांक ) ,स्वराज खांडेभराड ४६ वजन गटात (प्रथम क्रमांक), पृथ्वीराज साबळे ,(व्दितीय क्रमांक ),पृथ्वीराज मारकड (तृतीय क्रमांक),
