पोलीस डिपार्टमेंट से बैर नही-लेकीन डॉ आरती सिंग इनकी खैर नही म्हणत खासदार सौ नवनीत रवी राणा यांचा एल्गार


प्रतिनिधी जयकुमार बुटे

अमरावती च्या खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी पोलीस आयुक्त डॉ आरती सिंग यांच्याविरुद्ध विशेषाधिकार समिती कडे नव्याने दाखल केलेल्या तक्रारीची संसदीय कार्य मंत्री श्री प्रल्हाद जोशी व संसदीय कार्य राज्यमंत्री श्री अर्जुन राम मेघवाल यांनी घेतली गांभीर्याने दखल,केंद्रीय संसदीय कार्य मंत्र्यांच्या दालनात दोन्ही मंत्र्यांसमवेत खासदार सौ नवनीत रवी राणा यांची प्रदीर्घचर्चा,लवकरच या संदर्भात लोकसभेत पोलीस आयुक्त डॉ आरती सिंग यांच्याविरुद्ध विशेषाधिकार हनन प्रस्ताव लोकसभेत मांडून बहुमताने पारित करून घेणार-केंद्रीय संसदीय कार्यमत्र्यांची खासदार सौ नवनीत रवी राणा यांना ग्वाही


आमदार रवी राणा व इतर प्रतिष्ठीत नागरिकांना 307/353 सारख्या व दिल्ली पब्लिक स्कुल चे प्राचार्य श्री हिमांद्री देसाई यांना पोस्को सारख्या खोट्या गुन्ह्यात विनाकारण अडकवून त्यांचा छळ करणे पोलीस आयुक्त डॉ आरती सिंग यांना भोवणार पोलीस आयुक्त डॉ आरती सिंग या भ्रष्ट अधिकारी,जाऊ तिथे खाऊ हा कार्यक्रम राबवित त्यांनी जिथे जिथे पोस्टिंग होती तिथे तिथे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार,अवैध वसुल्या व खंडण्या जमा करून प्रचंड माया जमविली आहे व ठिकठिकाणी नामी बेनामी चल-अचल संपत्ती जमा केली असल्याचे खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी संसदीय कार्य मंत्र्यांचे निदर्शनास आणून दिले,

या वरून या सर्व प्रकाराला गांभीर्याने घेत आता पोलीस आयुक्त डॉ आरती सिंग यांची सीबीआय व ईडी मार्फत चौकशी होणार असून त्यांची बेहिशोबी मालमत्ता जप्त देखील होऊ शकते
अमरावती च्या पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असतांना दोन नंबरच्या धंदेवाल्याना सलाम करीत निरपराध व प्रतिष्टीत नागरिकांना गुलाम बनविले असून कायद्याचे रक्षण न करता केवळ त्या अवैध धंद्यातून मिळालेल्या मलाईचे भक्षण करीत असल्याचा आरोप देखील खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी यावेळी केला.

ज्याप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दंगा पथक असते त्याच पद्धतीने आपली पठाणी वसुली करण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ आरती सिंग यांनी 4 अधिकाऱ्यांचे विशेष वसुली पथक तयार केले असून रेतीघाट, वरली मटका,क्रिकेट सट्टा,वादग्रस्त जमिनीचे सेटलमेंट,वाळूतस्करी,गुटका तस्करी आदी बाबीतून अमाप वसुली करून ती रक्कम पोलीस आयुक्त डॉ आरती सिंग यांच्यापर्यंत पोहीचविते.

गेल्या 30 वर्षांपासून डीपीएस सारख्या देशातील नामांकित शैक्षणिक संस्थेत कार्यरत असणाऱ्या व 4 वर्षापासून अमरावती डीपीएस चे प्राचार्य म्हणून कार्य करणाऱ्या अनेक लोकांचे उज्वल भविष्य घडविणारे श्री हिमांद्री देसाई यांच्याविरुद्ध आपल्या कॅबिन मध्ये पोलीस निरीक्षक श्री मनीष ठाकरे व श्री कुरळकर यांच्या सहकार्याने सुडबुद्धितून आकसापोटी पोस्को सारखा खोटा गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली,त्यामुळे कायदा हा सर्वसामान्य नागरिकांच्या रक्षणासाठी आहे की निरपराध व प्रतिष्ठीत नागरिकांचे आयुष्य उध्वस्त करण्यासाठी असा संतप्त सवाल या चर्चेदरम्यान खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी केल्याने केंद्रीय संसदीय कार्य मंत्री श्री प्रल्हाद जोशी अवाक झाले.

व हा प्रकार आणि एका आयपीएस महिला अधिकाऱयांची अशी मनमानी व पदाचा दुरुपयोग करण्याची ही वृत्ती खपवून घेणार नसल्याचे अभिवचन सांसदीय कार्य मंत्र्यानी खासदार सौ नवनीत रवी राणा यांना दिले
प्रिविलेज कमिटी च्या माध्यमातून आता ही बाब लोकसभेच्या पटलावर येणार असून खासदार सौ नवनीत रवी राणा यांच्या या मागणीला जवळपास 50 खासदारांनी समर्थन दिल्याने व स्वतः सांसदीय कार्यमंत्र्यांनी याची दखल घेतल्याने आता लवकरच डॉ आरती सिंग यांच्याविरुद्ध सभागृहात या बाबतचा विशेषाधिकार हनन प्रस्ताव दाखल होऊन बहुमताने मंजूर होईल व त्यांच्यावर शिस्तभंगाची-निलंबन किंवा बडतर्फीची कार्यवाही होऊन ईडी-सीबीआय मार्फत त्यांची चौकशी होऊन त्यांची मालमत्ता जप्त होणार असल्याचे संकेत केंद्रीय पातळीवरून मिळत आहेत

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!