जिल्हा परिषदला आदर्श शिक्षक पुरस्काराचा मुहूर्त सापडला ,३० मार्चला वितरण सोहळा

जिल्हातील २६ प्राथमिक व २ माध्यमिक शिक्षकांचा समावेश

अमरावती – महेश बुंदे

शिक्षण विभाग जिल्हा परिषद अमरावती तर्फे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा बुधवार दिनांक ३०मार्चला दुपारी १२वाजता डाॅ.पंजाबराव देशमुख सभागृह जिल्हा परिषद अमरावती येथे संपन्न होणार आहे.यावेळी जिल्हा परिषद मधिल २८शिक्षकांना सहपत्निक पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्ष जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा हे राहणार असुन विशेष अतिथी अति.मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी,मुख्य लेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे,उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाळे,प्रमुख अतिथी डायटचे प्राचार्य डाॅ. मिलिंद कुबडे,उप,मु.का.अ.डाॅ.कैलास घोडके,समाज कल्याण अधिकारी राजेन्द्र जाधव,प्राथमिक शिक्षणाधिकारी ई.झेड.खान,माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रफुल्ल कचवे,उप शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख उपस्थित राहणार आहे.


यावेळी दोन वर्षाचे पुरस्कार वितरीत होणार आहे.सन २०१९-२०मधिल अचलपूर बबलू कराडे,अमरावती शहाजहा परविन मो.याकुब,अंजनगाव सुर्जी वैशाली सरोदे,भातकुली लखन जाधव,चांदुर बाजार मंगेश वाघमारे,चांदुर रेल्वे मनोज वानखडे,चिखलदरा वैजनाथ इप्पर,धामणगाव उमेश आडे,दर्यापूर किशोर बुरघाटे,धारणी योगिता भुमर,मोर्शी प्रियंका काळे,नांदगाव खंडे.सचिन विटाळकर,वरुड नंदकिशोर पाटिल या प्राथमिक शिक्षकांचा समावेश असुन माध्यमिक विभागातुन अमरावती येथिल किशोर इंगळे यांना पुरस्कार घोषित झाला आहे.

सन २०२०-२१करीता प्राथमिक विभागातुन अंजनगाव सुर्जी मधुन मिलिंद भगत,अचलपूर कु.अलका भोपडे,अमरावती सरफराज खान हिदायत खान,चांदुर बाजार कु.सविता वासनकर,चिखलदरा पंकज वर्‍हेकर,तिवसा निलेश कांडलकर,दर्यापूर ज्ञानेश्वर सांगळे,धामणगाव देविदास राठोड,धारणी कु.योगिता जिरापूरे,नांदगाव खंडे.अंकुश गावंडे,मोर्शी मोहन निंघोट,वरुड धनराज टिकस यांची निवड झाली आहे.तर माध्यमिक विभागातुन अमरावती येथिल श्रीमती रेखा राऊत यांची निवड झाली आहे.या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी ई.झेड.खान,उपशिक्षणाधिकारी प्रिया देशमुख,गंगाधर मोहने,शिक्षण विस्तार अधिकारी अशोक रामटेके,दिलिप तानोलकर,सोनोने मॅडम यांनी केले आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!