कामगारविरोधी धोरणाविरोधात दर्यापूर डाक कर्मचाऱ्यांचा संप

दर्यापूर – महेश बुंदे

केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात भारतीय डाक विभाग कर्मचाऱ्यांनी २८ ते २९ मार्च रोजी दोन दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. याच पार्श्वभूमीवर दर्यापूर तालुक्यातील डाक कर्मचारी यांनी दि. २८ मार्च रोजी तालुका डाक कार्यक्रम येथे संप पुकारला.


कामगार विरोधी कायदे रद्द करण्यात यावे, नवीन पेन्शन योजना रद्द करा आणि जुनी पेन्शन योजना सुरू करण्यात यावी. जीडीएस कर्मचाऱ्यांना सामूहिक विमा कवच लागू करा, डाकसेवेचे खाजगीकरण थांबवा,जीडीएस कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा लागू करावा,दि. १ जानेवारी २०१६ पासून १२,२४,३६ व्या वर्षी तीन आर्थिक पदोन्नती लागू करा, डाक मित्र योजना मागे घ्या,युनियन पदाधिकाऱ्यांना दोन टर्म पदावर राहण्यासाठी निर्बंध घालण्याचे आदेश मागे घ्या, नागरी विभागाच्या संवर्ग पुनर्रचना समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करा,यामध्ये नागरी शाखा कर्मचाऱ्यांचा समावेश ना पोस्टल विभागीय परीक्षा, पोस्टल नागरी शाखांच्या सुधारणेची अंमलबजावणी करा,पार्सल वितरणासाठी नोडल वितरण केंद्र आणि मध्यवर्ती वितरण करणे व वेगाने वितरण करणे बंद करा,रिक्त पदे त्वरित भरा,कोविडमुळे मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबाला १० लाखाची मदत करा,एसएससी ऐवजी पोस्ट विभागाच्या वतीने थेट भरती करण्यात यावी,थकबाकीची देय रक्कम मागील कालावधीसह आणि या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांसाठी पेन्शनरी पेमेंटसाठी काल्पनिक लाभ मंजूर करण्यात यावा,अशा विविध मागण्यांसाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.

या संपात दर्यापूर तालुक्यातील डाक अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. यामध्ये श्री.रेपांडे एस पी एम दर्यापुर,श्री.थोरात एस पी एम दर्यापुर टाऊन,श्री.देशमुख एस पि एम येवदा,श्री.पायडोळे बि पी एम अडुळाबाजार,श्री.कुटेमाटे बि पीएम कळाशी,श्री.सवाईकर बी पी एम लेहगाव,श्री.देवतळे ए बिपीएम आराळा,श्री.गादे एबिपिएम कळाशी,श्री.रेडे बिपीएम भामोद,श्री पंडीत एबिपिएम टाकळी,श्री.पाचळे बिपीएम गायवाडी,श्री.वाकोडे बिपीएम बाभळी,श्री.राऊत सेवा नीवृत बिपीएम टोंगलाबाद तसेच दर्यापुर टाऊन,येवदा व दर्यापुर तालुक्यातील सब डाक विभागातील सर्व विभागीय कर्मचारी व तीनही सब डाक मधील कर्मचारी आणि ग्रामीण बीओचे डाकसेवक संपात सहभागी झाले आहेत.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!