आमदार रवि राणा यांनी घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट

प्रतिनिधी जयकुमार बुटे

अमरावती :- राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन आमदार रवि राणा यांनी अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ आरती सिंग यांच्या भ्रष्ट मार्गाने कमावलेल्या संपत्तीची तक्रार दाखल,पोलीस आयुक्त डॉ आरती सिंग यांनी राजकीय दबावाला बळी पडून आमदार रवी राणा यांच्या विरुद्ध सुडबुद्धीची भावना ठेवून त्यांच्या सहित इतर निरपराध व प्रतिष्ठीत नागरिकांवर 307/353अंतर्गत खोटा गुन्हा दाखल केला व आमदार रवी राणा आणि इतर प्रतिष्टीत निरपराध नागरिकांचा छळ केला,तसेच दिल्ली पब्लिक स्कुल चे प्राचार्य हिमाद्री देसाई यांच्यावर सूडबुद्धीने पोस्को सारखा गुन्हा दाखल केला,आमदार रवी राणा यांचे राज्यपालांना लेखी निवेदन सादर केले आहे.

डॉ आरती सिंग यांची होणार सीबीआय व ईडी कडून चौकशी
या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी तात्काळ राज्याचे मुख्य सचिव व पोलीस महासंचालक यांना फोन लावून या प्रकरणात जातीने लक्ष घालण्याचे निर्देश दिले व पोलीस आयुक्तांवर सीबीआय व ईडी मार्फत चौकशी करून कठोर कार्यवाही करणार असल्याचे अभिवचन आमदार रवी राणा यांना दिले
अमरावतीच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट पोलीस आयुक्त म्हणजे डॉ आरती सिंग,यांच्याच कमकुवत कार्यशैली व राजकीय खेळी खेळण्याच्या वृत्तीमुळे अमरावती शहरात दंगल घडली,आरती सिंग या पोलीसी कर्तव्य पेक्षा राजकारण जास्त करतात,तोड्या करणे,सेटलमेंट करणे,अवैध धंद्यांना संरक्षण देणे व वसुल्या करणे,खोटे गुन्हे दाखल करण्याचा धमक्या देऊन खडणी उकळणे हेच आरती सिंग यांचे पोलिसवर्दीतील कार्य आहे.

आमदार रवी राणा यांचा राज्यपालांसमोर पोलीस आयुक्त आरती सिंग यांच्यावर आरोप
आमदार रवी राणा यांचा बदला घेण्यासाठी व त्यांना बदनाम करण्यासाठी शिक्षणक्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्रात इमानेइतबारे गेल्या 30 वर्षापासून कार्यरत असणारे व अमरावती च्या नामांकित दिल्ली पब्लिक स्कुल मध्ये प्राचार्य पदावर कार्यरत असणारे हिमांद्री देसाई यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचे कारस्थान पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी आपल्या कॅबिन मध्ये रचले व ठाणेदार श्री मनीष ठाकरे,ठाणेदार श्री कुरळकर यांना सांगून प्राचार्य हिमांद्री देसाई यांच्यावर एका पालकाला हाताशी धरून पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक सुद्धा केली,ही बाब आमदार रवी राणा यांनी राज्यपाल महोदयांच्या लक्ष्यात आणून देताच राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश दिले.


आमदार रवी राणा यांनी गेल्या 15 दिवसापासून सातत्याने पाठपुरावा करीत डॉ आरती सिंग यांच्या देशभरातील नामी-बेनामी अवैध संपत्तीची यादी जमा केली असून सदर यादी पुरव्यासहित आमदार रवी राणा हे सीबीआय आणि इडिकडे सुपूर्द करणार असल्याने आता पोलीस आयुक्त डॉ आरती सिंग या गोत्यात येणार असून त्यांच्यावर निलंबन किंवा बडतर्फीची कार्यवाही होऊन त्यांची अवैध संपत्ती जप्त सुद्धा केल्या जाऊ शकते असे जाणकारांचे मत आहे

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!