पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभाग पथकाची गांजा व गुटखा पदार्थाची विक्री,करणा-या इसमांवर कारवाई

सामाजिक सुरक्षा विभाग यांचे पथकाने गांजा या अंमली पदार्थाची विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक करणा-या इसमांवर आणि शासनाने प्रतिबंधीत केलेला तंबाखूजन्य गुटख्याची विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक करणा-या इसमांवर कारवाई केलेबाबत “

विशेष प्रतिनिधी बापूसाहेब सोनवणे

मा. पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यावर प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने सामाजिक सुरक्षा पथक हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने गोपनिय माहिती काढत असताना दिनांक २७/०३/२०२२ रोजी पिंपरी पोलीस स्टेशन हद्दीत गांजा या अंमली पदार्थाची विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक करणा-या इसमांवर कारवाई करण्यात आली आहे.

पहा कारवाई व्हिडिओ

दिनांक २७/०३/२०२२ रोजी सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी १८-०० वा चे सुमारास एस के वाघेरे कॉम्प्लेक्स, चौथा मजला, फ्लॅट नं. ८, नवमहाराष्ट्र शाळेचे मागे, पिंपरी पुणे येथे एक इसम हा त्याचे ताब्यात गांजा नावाचा अंमली पदार्थ साठवणुक करून स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी विक्री करीत आहे. अशी गुप्त बातमीदारकडुन मिळालेल्या माहितीवरुन सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी पिंपरी पोलीस ठाणे हद्दीत सापळा रचुन छापा टाकला असता आरोपीच्या ताब्यात मिळुन आलेल्या मुद्देमालाचे खालीलप्रमाणे आहे.

१) २८३७५०/-रुकिंचा ११ किलो वजनाचा अंमली पदार्थ गांजा, २) ६००० /-रुकिं रोख रक्कम, 3) २३३०/- रु किं स्टॅपलर, पिन बॉक्स/ प्लास्टिक पन्नी ४) २०००/- रु एक इलेक्ट्रॉनिक वजनकाटा,५) ६०००/- रु.किं. चा विवो कंपनीचा मोबाईल असा एकुण ३०१०८०/- रु किं चा मुद्देमाल मिळुन आला

यात आरोपी १, गौतम किसन गायकवाड, वय ४७ वर्षे, रा. एस के वाघेरे कॉम्प्लेक्स, चौथा मजला, फ्लॅट नं. ८, नवमहाराष्ट्र शाळेचे मागे, पिंपरी पुणे. २. दिपक ऊर्फ दिपेश इंद्रेकर, वय २४ वर्षे, रा. भाटनगर, पिंपरी, पुणे पाहिजे आरोपी ३ रेखा पोपटसिंग तामचीकर, वय ३८ वर्षे, रा. भाटनगर, पिंपरी, पुणे. म्हणुन त्यांचेविरुध्द पिंपरी पोलीस स्टेशन येथे गुर नं १६८ / २०२२ एन डी पी एस अॅक्ट कलम ८ (क), २०(ब) (ii) (ब) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन आरोपी क्र.१ व २ यांना अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास पिंपरी पोलीस ठाणे करीत आहे.

तसेच दिनांक २७/०३/२०२२ रोजी निगडी पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या शासनाने प्रतिबंधीत केलेला तंबाखूजन्य गुटख्याची विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक करणा-या इसमावर कारवाई करण्यात आली आहे.

दिनांक २७/०३/२०२२ रोजी सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी निगडी पोलीस स्टेशनचे हद्दीत इसम नामे इस्माईल शेख हा इंदिरानगर ओटास्किम निगडी पुणे येथे त्यावे राहते घरी गुटख्याची साठवणुक करून त्यावी अॅक्टिव्हा ६ जी नं. एमएल १४ जेएफ २५८८ हिचेवर

गुटख्याची वाहतुक करुन त्याची ओटास्किम निगडी परिसरात स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी विक्री करीत आहे अशा गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीवरुन सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी निगडी पोलीस स्टेशन हद्दीत सकाळी ०७-२५ वा चे सुमारास सापळा रचुन छापा टाकला अराता आरोपीच्या ताब्यात मिळुन आलेल्या मुद्देमालाचे खालीलप्रमाणे आहे.

१) ३६४४७ /- रु किं प्रतिबंधित गुटखा (आर एम डी पान मसाला, एम सेंटेड टोबॅको गोल्ड, विमल पान मसाला, चि-१ तंबाखु, रजनीगंधा पान मसाला, तुलसी रॉयल जाफरानी जर्दा) २) ८००००/- रुकिं. अॅक्टिव्हा ६ जी नं. एमएच १४ जेएफ २५८८ असा एकुण ११६४४७/-रुकिंचा मुद्देमाल मिळुन आला आहे.

म्हणुन १. इस्माईल अल्लाबक्स भाटघर, वय २७ वर्षे, रा. इंदिरानगर ओटास्किम निगडी पुणे पाहिजे आरोपी नामे २. नितीन हिरालाल छाजेड, वय ५६ वर्षे, रा. आकांक्षा निवास, दत्तवाडी, आकुर्डी, निगडी, पुणे याचेविरुध्द निगडी पोलीस स्टेशन येथे गु र नं २०८/२०२२ मा.दं.वि. कलम ३२७, २७२, २०७३, १८८, ३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन आरोपी क्र १ यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास निगडी पोलीस स्टेशन करीत आहे.

वरील दोन्ही कारवाई मध्ये एकुण ४१७५२७/- रु. किं. चा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदरच्या दोन्ही कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश मा. अप्पर पोलीस आयुक्त श्री. डॉ. संजय शिंदे, मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) डॉ. श्री. काकासाहेब डोळे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे डॉ. श्री. प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे, पोउपनि प्रदिपसिंग सिसोदे व पोलीस अंमलदार सपोफी विजय कांबळे, पोहवा किशोर पढेर, पोहवा कल्याण महानोर, पोहवा संतोष बर्गे, पोहवा सुनिल शिरसाट, पोहवा नितीन लोंढे, मपोहवा मोहिनी थोपटे, पोना मारुती करचुंडे, मपोना संगिता जाधव, पोशि अतुल लोखंडे, मपोशि रेश्मा झावरे यांनी केली आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!