नाम फाउंडेशनने दिलेल्या आर्थिक मदतीचा आपण योग्य प्रकारे वापर करावा – मनोज लोणारकर

(अंजनगाव दर्यापूर तालुक्यातील ४३ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला दिला मदतीचा हात)

दर्यापूर – महेश बुंदे

अमरावती :- आत्महत्या करणे हा काही पर्याय
नाही मात्र प्रत्येकाने खर्च करताना कुटुंबाला अपेक्षित असलेल्या खर्चाला अनुसरून कार्य केले तर आत्महत्या करण्याची पाळी येत नाही मात्र नाइलाजाने काही कुटुंब प्रमुख आत्महत्या करतात त्या आत्महत्या ग्रस्त कुटुंबाला एक मदतीचा हात म्हणून नाम फाउंडेशन प्रमुख नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे विदर्भ समन्वयक हरीश इथापे आदींच्या मार्गदर्शनाखाली अमरावती जिल्हा समन्वयक वासुदेव जोशी हे आर्थिक मदत करतात.

त्या मदतीचा उपयोग अपेक्षित असलेल्या कामासाठी केला पाहिजे असे मत उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर यांनी केले ते नाम फाउंडेशन पुणे तर्फे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आर्थिक सहकार्य देण्याकरिता आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते, अंजनगाव दर्यापूर तालुक्यातील एकूण ४३ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या प्रमुखाला प्रत्येकी २५ हजार रुपये चेक तहसीलदार डॉ. योगेश देशमुख, नायब तहसीलदार कृष्णा गाडेकर, अमरावती जिल्हा समन्वयक वासुदेव जोशी, संदीप गुडधे, प्रमोद जोशी, सोपान गोंड सर यांच्या उपस्थित रामदेव बाबा मंदिर सभागृह येथे वाटप करण्यात आले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद जोशी यांनी तर आभार राज जोशी यांनी मानले.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!