जम्मू येथे झालेल्या सिनिअर राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये मानव जाधव याचा सुवर्ण वेध

दर्यापूर – महेश बुंदे

जम्मू येथे दि. २५ ते २७ मार्च रोजी सिनिअर राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये महाराष्ट्र संघात मानव जाधव याची निवड झाली होती. राष्ट्रीय स्पर्धेमध्ये जम्मू, मध्यप्रदेश, राजस्थान, दिल्ली संघाचा पराभव करत त्याने सुवर्ण पदक प्राप्त केले. तो या स्पर्धेतील सर्वात लहान खेळाडू होता.दि. ६ ते ९ एप्रिल या कालावधीत झारखंड येथे होणाऱ्या स्पर्धेकरिता सुद्धा निवड झाली आहे. तो बुलढाणा येथील शिवबा आर्चरी अकॅडमीमध्ये चंद्रकांत इलग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. तो शरदा कॉन्व्हेंटचा विद्यार्थी आहे. मानव आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, प्रशिक्षक, महाराष्ट्र आर्चरी संघटनेचे सचिव प्रमोद चांदुरकर, अध्यक्ष प्रशांत देशपांडे, सदानंद जाधव व मित्र परिवार यांना देते.


त्याच्या या यशाबद्दल दत्ता जळमकर, डॉ.गोपाल जऊळकार, प्रा.डॉ. देवीलाल आठवले, प्रा.निलेश जळमकर, पुरुषोत्तम बावणेर, प्रकाश महल्ले यांनी त्याचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!