शालेय शिक्षण मंत्र्याने दिला जिल्हा परिषद शाळेला एक लक्ष रुपयांचा धनादेश ; राज्यमंत्री ना.बच्चू कडू यांच्या कृतीचे सर्वत्र कौतुक

दर्यापूर – महेश बुंदे

तालुक्यातील तोंगलाबाद येथील आयएसओ नामांकन प्राप्त जिल्हा परिषद प्राथमिक मराठी डिजिटल शाळेला राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री ना. बच्चूभाऊ कडू यांनी आपली आई स्व. इंदिराबाई बाबाराव कडू यांच्या स्मृती प्रित्यर्थ एक लक्ष रुपयांचा धनादेश दिला. तोंगलाबाद-सौंदळी परीसरातील श्री पांडुरंग हरी आश्रम येथे स्व. ओंकारबाप्पू जाधव व स्व.इंदिराबाई जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने आयोजित सुविधा लोकार्पण व कृतज्ञता सोहळ्याला उपस्थित राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री ना.बच्चूभाऊ कडू आले असता, त्यांचा जाधव परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला.

त्यावेळी ना.बच्चूभाऊ कडू यांच्या विधवा महिलांसाठी काम करणाऱ्या ‘वीर बाजीप्रभू संस्थेला’ जाधव परिवाराच्या वतीने ५० हजार रुपयांचा धनादेश दिला. हाच धनादेश व स्वतःचे ५० हजार असे एकूण एक लक्ष रुपये तोंगलाबाद येथील जिल्हा परिषद शाळेला त्यानी या कार्यक्रम प्रसंगी शाळेचे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक नंदकिशोर रायबोले यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी माजी आमदार तुकारामजी बिडकर, सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज, जिल्हा परिषद सभापती बाळासाहेब हिंगणीकर, जिल्हा बँक अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे, सुनील गावंडे, मधुकरराव अंबरते, गिरीधर बोरखडे, निळकंठ टापरे, सदानंद जाधव, अरुणराव जाधव, गणेशराव जाधव, प्रा.डॉ. देवलाल आठवले, प्रा.निलेश जळमकर, पुरुषोत्तम बावणेर आदी उपस्थित होते. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा खाजगी शाळेच्या स्पर्धेत टिकल्या पाहिजे,यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करून राज्यातील जिल्हा परिषद शाळाची शैक्षणिक,भौतिक प्रगतीत आपला खारीचा वाटा उचलावा असे आवाहन त्यांनी केले.

त्याच्या या कृतीचे तोंगलाबाद येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक नंदकिशोर रायबोले, शिक्षिका तेजस्वीनी अटाळकर, ग्रामपंचायत सरपंच वैशाली निरंजन पानझाडे, उपसरपंच सुभाषराव जऊळकार, ग्रामपंचायत सदस्य ममता संतोष ठाकरे, अन्नपूर्णा हरिदास काळदाते, सविता प्रकाश सोळंके, माधुरी अमोल काळे, अलका वासुदेव जऊळकार, सेवा सोसायटी अध्यक्ष अनिल पाटील जळमकर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रंगराव जळमकर, माजी सरपंच रामहरी राऊत, डॉ गोपाल जऊळकार, श्रीरामजी जऊळकार, रावसाहेब जळमकर, अंबादास जऊळकार, पुंडलिकराव राऊत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनीष बावणेर, उपाध्यक्ष मुक्ता संदीप चव्हाण, सदस्य उमेश बायस्कर, अनिल जामणिक, संतोष साठे, सोनल अनंता जऊळकार, सीमा सदानंद काळदाते, रुपाली दीपक धारपवार, शिल्पा सतीश अटबर, शिक्षणतज्ञ धनंजय देशमुख,अंगणवाडी सेविका सुनीता जळमकर, मदतनीस नीलिमा मेहरे व गावकरी मंडळी आणि विद्यार्थी यांनी कौतुक करून आभार मानले.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!