Post Views: 569
अंजनगाव सुर्जी – महेश बुंदे
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील रहिमापुर पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या विहिगाव येथील इसमाचा कालवाडा शेत शिवारातील एका शेतात (दि. २७) सायं ६ वाजताच्या दरम्यान बेवारस मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. घात की उष्माघाताने इसमाचा मृत्यू झाला आहे, अशा शंका कुशंकेला गावात ऊत आला आहे.
याची माहिती रहिमापुर चिंचोली पोलीसांनी देण्यात आली. सविस्तर माहिती अशी की, अनिल बाळकृष्ण अभ्यंकर वय ४२ वर्ष रा. विहिगाव या इसमाचा काल कालवाडा शेत शिवारातील शेतात मृतदेह बेवारस अवस्थेत आढळून आला. याची माहिती शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांनी रहिमापुर चिंचोली पोलिसांना दिली. माहिती मिळताच एएसआय गजानन वर्मा, पोकॉ अभिजीत खंडन, पोकॉ.संतोष माहोरे यांनी घटनास्थळी पोहचून मृतदेहाचा पंचनामा केला.
मृतकाची माहिती काढल्यास मृतक हा विहिगाव येथील अनिल बाळकृष्ण अभ्यंकर असल्याची खात्री पटली, तो शेळ्या चारण्याचे काम करत होता तसेच शेताची रखवाली सुद्धा करत असल्याची माहिती समोर आली. मृतक हा शेतात शेळ्या चारायला गेला असता त्याचा कडक उन्हामुळे मृत्यू झाला असावा अशी स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा आहे. तसेच हा घातपात सुद्धा असू शकते अशी ही शंका व्यक्त केली जात आहे. सदर इसमाच्या अचानक मृत्यूची वार्ता परिसरात पसरताच खळबळ उडाली आहे. पोलीसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय अंजनगाव सुर्जी येथे पाठविला. घात की उष्माघात याचा पुढील तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात रहिमापूर चिंचोली पोलीस करीत आहे. मृतकाचे शव विच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या सुपूर्त करण्यात आला.