Post Views: 520
अमरावती प्रतिनिधी जयकुमार बुटे
महाराष्ट्र राज्य बाजार समितीच्या महासंघ म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ पुणे यांची पंचवार्षिक निवडणूक 18 मार्च 2018 रोजी झाली होती दिनांक 21 मार्च 2018 रोजी मतमोजणी होती मात्र सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने याचिकेवरील निर्णय होईपर्यंत मतमोजणी रखडली होती 15 2022 रोजि याचिका निकाली काढण्यात आली.
तब्बल चार वर्षानंतर महाराष्ट्र राज्य बाजार समिती महासंघ म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ पुणे पंचवार्षिक निवडणूक कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावतीचे उपसभापती ज्ञानेश्वर उर्फ नानाभाऊ नागमोते यांनि 16 पैकि 9 मते घेऊन विजय मिळविला या मतदानात 16 सदस्यांनी मतदानात भाग घेतला होता आमचे प्रतीनिधी जयकुमार बुटे यांनि नानाभाऊची भेट घेतली असता त्याच्या म्हणण्यानुसार लोकनेते स्वर्गीय संजयभाऊ बंड यांच्या आशीर्वादने महाराष्ट्र राज्य बाजार समिती महासंघ पुणे. या निवडणुकीमध्ये नानाभाऊ नागमोते यांना निवडणूक रिंगणात उतरवले होते.
मात्र सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने निवडणुकीच्या निकालावर स्थगिती होती .आज निवडणुकीचा निकाल घोषित झाला असून त्यामध्ये माझी संचालकपदी म्हणून निवडणुक जिंकून आल्यामुळे स्वर्गीय संजयभाऊ बड स्वप्नपूर्ती पूर्ण झाली आहे असे सांगण्यात आले निकाल जाहीर होताच संपूर्ण शिवसैनिक नानाभाऊचे स्वागत करण्याकरिता एकच गर्दी करत होते