विशेष प्रतिनिधी बापूसाहेब सोनवणे
राजगुरूनगर ता.२७ खेड तालुका पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा आयोजित सन्मान गुणवंतांचा व महिला शिक्षिका साठी खेळ पैठणीचा दिमाखदार सोहळा ईश्वरी लॉन चांडोली येथे संपन्न झाला.

प्रतिमा पूजन ,दीप प्रज्वलन करुन प्रारंभ झाला.व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.निर्मलाताई पानसरे, विद्या प्राधिकरण उपविभाग प्रमुख डॉ.राजेश बनकर साहेब , पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण मंडळ शिक्षण अधिकारी संजय नाईकडे साहेब ,ठाणे जिल्हा शिक्षण अधिकारी भाऊसाहेब कारेकर साहेब ,खेड पंचायत समिती गटशिक्षण अधिकारी जीवन कोकणे साहेब ,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण परिषद पुणे अधिव्याख्याता बाळकृष्ण वाटेकर,संघटना जिल्हा अध्यक्ष शांताराम नेहरे,तालुका अध्यक्ष नारायण करपे,राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक सातपुते गुरुजी यांसह महिला आघाडी अध्यक्ष संजीवनी चिखले, प्रनोती गावडे,यांसह मान्यवर माजी अध्यक्ष मुगुटराव मोरे , शिक्षक समिती अध्यक्ष सुरेश आदक आदी उपस्थित होते.

शैक्षणिक वर्ष २०२१ मध्ये इयत्ता ५ वी ८ वी शिष्यवृत्ती गुणवंत सर्व विद्यार्थी,मार्गदर्शक शिक्षक,तसेच राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक नागनाथ विभुते सर,राज्य माहिती तंत्रज्ञान पुरस्कार प्राप्त कविता टाव्हरे बोऱ्हाडे, जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक रामकृष्ण वाटेकर, शशिकांत सुर्वे,छाया गावडे,स्वाती खैरे,रेखा बोत्रे, तसेच सामान्य ज्ञान पुस्तिका मार्गदर्शक..बाबाजी शिंदे,अनुपमा बाविस्कर,सुरेखा निकुंभ,स्नेहल भोर यांचा सत्कार करण्यात आला.

संघटनेच्या वतीने कोरोना काळात घेण्यात आलेल्या ऑनलाईन कविता व निबंध स्पर्धा विजेते सर्व शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला.काव्य व निंबंध लेखन स्पर्धेत कविता सुनील धुमाळ यांचा प्रथम क्रमांक आला.तसेच इतर सर्व विजेत्या साहित्यिक शिक्षक बंधू भगिनी यांचा सत्कार करण्यात आला.निबंध लेखन स्पर्धा विजेत्या स्पर्धकांना गौरवण्यात आले.
सर्व शिक्षक यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
जिल्हा अध्यक्ष शांताराम नेहरे यांनी प्रास्ताविक केले.यानंतर अधिव्याख्याता बाळकृष्ण वाटेकर साहेब,गट शिक्षण अधिकारी जीवन कोकणे साहेब , उपविभाग प्रमुख डॉ.राजेश बनकर, शिक्षण अधिकारी भाऊसाहेब कोरेकर,शिक्षण अधिकारी संजय नाईकडे साहेब,जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांनी शिक्षक व विद्यार्थी याना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले.
