प्रतिनिधी ओम मोरे
पुणे : ग्रीन फाउंडेशने पक्ष्यासाठी धान्य व पाणी उपलब्ध करून २०२२ या वर्षी हा उपक्रम राबविण्यात राबविला आहे.
पाण्याची तहान भागवण्यासाठी पक्ष्यांची अविरत धडपड सुरु असते या घडपडीला सुसह्य करुन त्यांच्या जिवाला थोडासा गारवा देण्यासाठी लोणी काळभोर येथे झाडाझुडपांत, डोंगरात व लोणी काळभोर परिसरातील सोसायटीच्या टेरेसवर धान्य व पाणी ‘ग्रीन फाउंडेशन’ने उपलब्ध करून दिले.

पक्ष्यांच्या जिवाला गारवा देण्यासाठी ग्रीन फाऊंडेशनने उपलब्ध केलेल्या व्यासपीठाला समाजाची साथ हवी असल्याचे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप यांनी केले. विविध सुरक्षित ठिकाणी पक्ष्यांना निवारा उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक असलेली घरटी, पाण्यासाठीची भांडी, धान्य पक्षी प्रेमीना देण्यात आले. तसेच त्यांच्या अंगणात अथवा पक्ष्यांसाठी गरज असलेल्या ठिकाणी घरटी व पाण्याची भांडी, बसविण्यात आली.

अन्न व पाण्यासाठी अंगणात, विविध परिसरात भटकणाऱ्या पक्ष्यांना या उपक्रमातून वात्सल्याचा ओलावा द्यायचा आहे त्यासाठी ग्रीन फाउंडेशनचे सहकार्य लाभणारच आहे शिवाय आणखीही संस्था, व्यक्तींना या उपक्रमामध्ये सहभागी होऊन निरागस पक्ष्यांसाठी हक्काचे घर व अन्न देता येऊ शकते असे जगताप यांनी सांगितले.
