चांदूर रेल्वे: धीरज पवार
येथील वंचित बहुजन आघाडीच्या पक्ष कार्यालयात वंचित बहुजन आघाडीचा तिसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे अमरावती जिल्हाध्यक्ष अशोक मोहोड,प्रमुख अतिथी म्हणून वंचित बहुजन युवा आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष निलेश विश्वकर्मा,जिल्हा महासचिव प्रा.रवींद्र मेंढे,महिला आघाडीच्या चांदूर रेल्वे तालुकाध्यक्षा बेबीनंदा लांडगे,नवनियुक्त तालुकाध्यक्ष मिनेश शिंदे,शहर अध्यक्ष केशव केने उपस्थित होते.
निलेश विश्वकर्मा व अशोक मोहोड यांच्या हस्ते छ.शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.यावेळी नवनियुक्त तालुकाध्यक्ष मिनेश शिंदे,शहर अध्यक्ष केशव केने,तालुका उपाध्यक्ष अनिल इंगोले,आमला जि.प.सर्कल प्रमुख अनिल जिवतोडे,तालुका कार्यकारिणी सदस्य विनोद चेंडकापूरे,गिरीश पवार,मारोती तलवारे यांच्यासह सर्व नवनियुक्त तालुका कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.याप्रसंगी निलेश विश्वकर्मा यांनी वंचित बहुजन आघाडीने पदार्पणात प्रस्थापित पक्षांना धडकी भरविली असुन तीन वर्षापासून वंचित बहुजन आघाडीची यशस्वी घौडदौड सुरू आहे.सर्वसामान्य कार्यकत्र्याला निवडून आणण्याची ताकद फक्त वंचितमध्ये असुन कार्यकत्र्यांनी येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये वंचितचा झेंडा सतत फडकवित ठेवा असे आवाहन करीत कार्यकर्त्यांना पक्षाच्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक मोहोड यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
