मुर्तिजापूर :तालुक्यातील पारद गावामध्ये लोकांच्या मनामध्ये शांतता नांदावी याकरिता शांतता रॅलीचे आयोजन भिक्कु शिलानंद यांचा श्रावक संघाला संपूर्ण जाती-धर्माच्या लोकांनी दिले.
भोजनदान. गावामध्ये सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदावे असे मार्गदर्शन भंते शिलानंद (धम्मभूमी मंगरूळ कांबे) यांनी केली जगामध्ये युक्रेन रशिया जे युद्ध सुरू आहे याच्यावर तोडगा म्हणजे बुद्ध धम्म या जगाला तारू शकेल असे आव्हान भंते धम्मसार (आदिलाबाद तेलंगणा) यांनी केली.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून अध्यक्षस्थानी असलेले भारतीय बौद्ध महासभेचे भिक्कु संघाचे उपाध्यक्ष भंते बुद्ध पालजी , भंते एस नागसेन, भंते जंबुद्वीप, भन्ते राहुल वंश भंते संघवर्धन, भंते महानाम व संपूर्ण श्रावक संघ उपस्थित होता. तसेच सर्व जाती धर्माचे श्रद्धावान उपासक-उपासिका यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेम कुमार गवई यांनी केले तर आभार प्रदर्शन रितेश गवई यांनी मानले .
तर कार्यक्रम यशस्वी करण्याचे आयोजन रमाई उपासिका संघ जुनी वस्ती, रमाई उपासिका संघ नवीन वस्ती, भिम शक्ती मंडळ जेतवन बुद्ध विहार समिती, संपूर्ण जाती धर्माच्या लोकांनी सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी केला.