तोंगलाबाद येथील रा.से.यो. विशेष श्रमसंस्कार शिबीरात चिमुकलीचा जबरदस्त डान्स

दर्यापूर – महेश बुंदे

कोणतंही काम सोपं नसतं. मात्र जर इच्छाशक्ती प्रबळ असेल तर काम सोपं नक्कीच होतं. एक काळ असा होता, जेव्हा डान्स करणारी किंवा गाणं गाणारी लहान मुलं फार कमी दिसायची. मात्र आता सोशल मीडियाच्या वाढत्या वापरासोबतच लहान मुल सुद्धा उत्तम प्रकारे डान्स करू लागली आहेत. सध्या एका अशाच लहानशा चिमुकलीचा डान्स तोंगलाबाद येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबीरात (दि. २५) सायंकाळच्या सुमारास आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात पहावयास मिळाला, इतक्या लहान वयात तोंगलाबाद येथील गौरी सोळंके या चिमुकलीने अतिशय सुंदर पद्धतीने डान्स केला, तिच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि आपल्या डान्सची पद्धत मन जिंकणारी होती.

क्षेत्रीय समन्वयक प्रा. डॉ. गाजनन हेरोळे, कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. हरिदास आखरे, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. हावरे, गटप्रमुख रा.से. यो जागृती पटले, पोलीस पाटील सौ. ललिता काळे, अध्यक्ष, संत लष्करी हनुमान महाराज संस्थान रावसाहेब पाटील जळमकर, सरपंच वैशाली पानझाडे, उपसरपंच सुभाष जऊळकार, सदस्य सविता सोळंके, माधुरी काळे, ममता ठाकरे, अन्नपूर्णा काळदाते, तंटामुक्ती समिती अध्यक्ष रंगराव जळमकर, जय बजरंग व्यायाम शाळा समितीचे श्रीराम जऊळकार, संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीचे अनिल जळमकर, सामाजिक कार्यकर्ते महेश बुंदे या शिवाय इतरही अनेकांनी या चिमुकलीच्या टॅलेंटचं कौतुक केलं आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!