Post Views: 350
समृध्दी महामार्गावर काम चालु असलेल्या ठिकाणी वाहनांमधुन बॅटरी व डिझेल चोरी करणारे आरोपी गजाआड
प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:-पोलिस स्टेशन जउळका हद्यीतील ग्राम कवरदरी नजिक समृध्दी महामार्गाचे काम प्रगतीपथावर असुन शेखावती इंटरप्रिनिअर या ठेकेदार कंपनीचा सदर ठिकाणी कॅम्प आहे. दि. १९/०३/२०२२ रोजी रात्री सुमारे १२.०० ते ०४.०० वा.च्या दरम्यान सदर कॅम्ववरील ०४ टिप्पर व ०१ एक्सावेटर या पाच वाहनांच्या १० बॅट-या व वाहनांतील सुमारे ५०० लिटर डिजेल असे एकुण सुमारे ९०,०००/रू चा मुद्देमाल चोरीला गेल्याची तकार कंपनीचे मेकॅनिकल इंजिनिअर श्री. आकांशु अजयबिरसिंग गैहलोत यांनी पो.स्टे. जउळका येथे दिली.त्याप्रमाणे अपराध क. ६७/२०२२ कलम ३७९ भा.द.वि. प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हयाचा तपास चालु असताना जउळका पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून ग्राम कवरदरी येथील संशयीत इसम अक्षय संजय पवार वय २० वर्षे तसेच त्याचे साथीदार आदेश सुरेश राठोड वय १९ वर्षे व विधी संघर्षित बालक इतिहास सुरेश राठोड वय १६ वर्ष या तिघांनी मिळुन सदर चोरी केल्याची गोपनीय माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर तीन्ही इसमांना ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्यांनी वरील गुन्हयाची कबुली दिली असुन गुन्हयाचे तपासात आरोपींकडुन ११ बॅटरी किंमत अंदाजे ७७,०००/रू तसेच ८५ लिटर डिजेल किंमत अंदाजे ९०००/रू व गुन्हयात वापरलेले दुचाकी वाहन हिरो ॲचिव्हर क्रमांक एम एच ३७ वाय ४६६२ किंमत अंदाजे २५,०००/रू असा एकुण १,११,०००/रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशाप्रकारे चोरीच्या गुन्हयाची ऊकल करण्यात जउळका पोलीस स्टेशनला यश आले आहे.
सदरची कामगीरी हि मा. पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह (भापोसे), मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. गोरख भामरे (भापोसे) व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सपोनि अजिनाथ मोरे, पोउपनि प्रणिल,पाटील, चालक सपोउनि निरंजन वानखडे, नापोकॉ निलेश घुगे, पोकॉ दिपक कावरखे यांनी पार पाडली आहे.