प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:-जिल्हा ऊद्योग केंद्र वाशिम आणी महाराष्ट ऊद्योजगता विकास केंद्र वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसुचित जमाती प्रवर्गातील महिलांना बेकरीचे प्रशिक्षण देण्यात आले होते.या प्रशिक्षणार्थी महिलांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपञ वितरित करुन ऊद्योगाविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
अनुसुचित जमाती प्रवर्गातील महिलांना विविध गृहऊद्योगाचे प्रशिक्षण देवून त्यांचा आर्थीक स्तर ऊंचावण्याकरीता ऊद्योगामधून स्वयंरोजगार ऊपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीकोणातुन जिल्हा ऊद्योग केंद्र वाशिम आणी ऊद्योजगता विकास केंद्र वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसुचित जमाती या प्रवर्गातील जवळपास तेहतीस महिलांना बेकरी या विषयाचे प्रशिक्षण दिनांक १७ डिसेंबर ते १५ जानेवारी पर्यत आयोजित करण्यात आले होते.सदर प्रशिक्षणात केकचे विविध प्रकार तसेच बिष्कीट,खारी,ब्रेड,तोष इत्यादी विषयाचे प्रशिक्षण वर्षा बाहेती यांनी दिले.
