येवदा, वडनेरगंगाई झोन मध्ये दोन दिवसाआड पाणी पुरवठा…सामाजिक कार्यकर्ते नकुल सोनटक्के यांची एक दिवसाआड पाणी पुरवठ्याची मागणी

दर्यापूर – महेश बुंदे

उन्हाची दाहकता वाढत असल्याने पिण्याच्या पाण्याची मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे बघायला मिळत आहे. दर्यापूर तालुक्यातील येवदा वडनेरगंगाई झोनमध्ये अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने परिसरातील नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे दि. १७ मार्च पासून येवदा, वडनेरगंगाई झोनमध्ये दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याबाबत शाखा अभियंता अभय देशमुख यांनी तुघलकी फर्मान काढले.

महाराष्ट्र जिवन प्राधिकरण देखरेखीखाली शहानूर धरणावर हा प्रकल्प सुरू आहे. दर्यापूर अंजनगाव तालुक्यातील जनतेची तहान भागविणारा महत्वकांक्षी प्रकल्प म्हणून या प्रकल्पाचे नावलौकिक सुद्धा आहे परंतु प्राधिकरण अधिकारी, कर्मचारी व ठेकेदारांच्या मनमानी व हुकूमशाही कारभारामुळे हा शहानूर प्रकल्प रसातळाला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अवैध नळ कनेक्शन, लिकेजेसमुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे मात्र याची झळ सामान्य नागरिकांना सोसावी लागत आहे. शहानूर धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असून सुद्धा नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये मजीप्रा विरोधात रोष निर्माण होत आहे. याबाबत येवदा येथील सामाजिक कार्यकर्ते नकुल सोनटक्के, ग्राहक मंचाचे प्रकाश तायडे, प्रमोद शिंगांजुळे यांनी दि. २३ मार्च रोजी उपविभागीय अभियंता श्री. शेंडे यांचेसोबत या समस्येबाबत चर्चा करून पाणी पुरवठा नियमित एक दिवसाआड करण्याची मागणी केली आहे. सोनटक्के यांनी कार्यकारी अभियंता अमरावती यांना सुद्धा सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याबाबत कळविले. त्वरित तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!