केंद्रस्तरिय शाळापूर्व तयारी प्रशिक्षण कार्यशाळा नाणेकरवाडी येथे संपन्न झाली .

विशेष प्रतिनिधी बापूसाहेब सोनवणे


केंद्रशासनाच्या नवीन शालेय धोरणाची अंमलबजावणी कशी करावी तसेच गेली दोन वर्षातील करोना काळातील विद्यार्थांचे झालेले शैक्षणिक नुकसान कमी करुन मुलांची शैक्षणिक आवड पुर्नःप्रस्थापित करणे व पुढील शैक्षणिक वर्षात नव्या जोमाने शैक्षणिक सुरुवात करणे हा मुख्य उद्देश या प्रशिक्षणाचा असल्याचे मार्गदर्शक शिक्षक संतोष तळोले व सुनंदा कारोटे यांनी सांगितले. या कामी पालकांचे मेळावे घेऊन त्यांचे उद्बोधन करणे ,मुलांची प्राथमिक मानसिकता तयार करणे महत्वाचे असल्याचे केंद्रप्रमुख हिरामण कुसाळकर यांनी सांगीतले .इयत्ता पहिली ते पाचवी चे सर्व शिक्षक व अंगणवाडीच्या कार्यकत्या यांना हे प्रशिक्षण देण्यात आले.

सदर प्रशिक्षण वर्गाची सुरुवात सरस्वती पुजनाने कुरुळी केंद्राचे केंद्रप्रमुख हिरामण कुसाळकर , मुख्याध्यापक अरुण गायकवाड , लक्ष्मी दाते , संदीप नानेकर, शेख सर, शंकर कड , तुकाराम भोसकर, इंदुमती पवार, संतोष तळोले, विठ्ठल डफळ, सुनंदा कारोटे, यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर तालुकास्तरीय इंग्रजी अध्ययन समृद्धी स्पर्धेत प्रथम, द्वितीय,तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे सन्मान नाणेकरवाडी शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांच्या मार्गदर्शक शिक्षक व मुख्याध्यापकांनी सन्मान स्वीकारला. यानिमित्ताने नाणेकरवाडी शाळेची कथा सांगणे या स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेती समीक्षा झाडोकार या विद्यार्थिनीचा दोनशे रुपये देऊन श्रीमती लोखंडे मनिषा मॅडम यांनी सत्कार केला. प्रशिक्षणाला केंद्रातील सर्व 1 ते 5 चे शिक्षक व अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस उपस्थित होते. शेवटी निलेश जगताप सर यांनी सर्वांचे आभार मानले व प्रशिक्षणाची सांगता करण्यात आली.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!