दर्यापूर – महेश बुंदे
अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त दर्यापूर शहरामधील गणेश लक्ष्मी मंदिर हॉल व साई मंदिर हॉलमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उत्सव माझ्या राजाचा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. सदर कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते महाराजांच्या मूर्तीचे पूजन, आरती करून फटाक्यांच्या आतिषबाजीने सोहळ्याला सुरुवात करण्यात आली,
यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते. आयोजित रांगोळी स्पर्धमध्ये दर्यापूरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदविला, सदर स्पर्धेमध्ये सीमा दिनेशराव गोलाईत प्रथम क्रमांक, शुभांगी अनिल येवले द्वितीय क्रमांक, शुभम गजानन डोईफोडे परतवाडा तृतीय क्रमांक, तसेच सात बक्षीस उत्तेजनार्थ बक्षीस देऊन स्पर्धेमध्ये झालेल्या सर्व सहभागी स्पर्धकांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.

कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून राजेंद्र गायगोले माजी जिल्हाध्यक्ष मनसे, तर प्रमुख अतिथीमध्ये डॉ. योगेश देशमुख तहसीलदार दर्यापूर, डॉ. सचिन नागे, पंकज लोंधे, पत्रकार संजय कदम, तृप्ती भोम्बे, अनुराधा ठाकरे, परीक्षक जयश्री चव्हाण, ज्योती सोमवंशी, मनोज तायडे तालुकाध्यक्ष मनसे दर्यापूर, गोपाल तराळ जनहित, तालुकाध्यक्ष लकी गावंडे, शहराध्यक्ष अमित टावरी, व्यासपीठावर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाकरिता प्रथमेश राऊत विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष, राम शिंदे शहराध्यक्ष जनहित, शुभम रायबोले ऊपतालुकाध्यक्ष, संदिप झळके उपशहराध्यक्ष, मयुर कडू, अनिकेत सुपेकर, रोशन कावडकर, अनिकेत सुरपाटणे, अंकुश भडांगे, सोहम राऊत, संतोष रामेकर, सोपान धांडे, या सर्व मनसैनिकांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रयत्न केले. सदर कार्यक्रमाला लहान मुलांच्या वेशभूषा शिवाजी महाराज, जिजाबाई तसेच मावळ्यांच्या भूमिका आकर्षित करत होत्या, कार्यक्रमामध्ये शिवाजी महाराजा बद्दल अभिनंदन मनोज तायडे, सानिका निलेश राऊत यांनी मनोगते सादर केली, सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम जाऊळकर तर आभार प्रदर्शन पंकज कदम उपतालुका अध्यक्ष यांनी केले.
