Post Views: 310
(छातीवर लावणार शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या प्रतिमा)
दर्यापूर – महेश बुंदे
शहिद होऊ घातलेल्या शकुंतला रेल्वेला वाचवण्यासाठी शहिद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या प्रतिमा छातीवर लाऊन दि २३ मार्च २०२२ शहिददिनी, शकुंतला रेल्वे आहे त्या स्थितीत, तात्काळ सुरू करण्यात यावी म्हणून, शकुंतला बचाव सत्याग्रह व विविध सामाजिक संस्था, व्यापारी, शैक्षणिक प्रतिष्टाने यांच्या कृतिशील सहभागातून, शकुंतला स्वाक्षरी महाअभियान सत्याग्रहाचे आयोजन करण्यात येत आहे.
या स्वाक्षरी सत्याग्रहाचे अचलपूर ते यवतमाळ रेल्वे मार्गावरील, सर्व रेल्वे स्थानक क्षेत्रात, एक लाख सह्याचे उद्धिष्ट आखण्यात आले आहे. या स्वाक्षरी सत्याग्रहा दरम्यानच, अचलपूर ते यवतमाळ रेल्वे मार्गावरील सर्व स्थानिक संस्था, शाळा, कॉलेज, ग्रा पं, नगर पालिका, महानगरपालिकानी स्वाक्षरी सत्याग्रहा सोबतच, आपल्या संस्थाचे शकुंतला रेल्वे, संत गाडगेबाबा विचार पर्यटन रेल्वे, हेरिटेज रेल्वे म्हणून तात्काळ सुरू करावी, असे ठराव करण्यासाठी, विनंती करण्यात येणार आहे. १४ सप्टेंबर २०२१ ला भारतीय रेल्वे प्रशासनास निवेदन व मूर्तिजापूर रेल्वे स्थानकाची स्वच्छता, २ ऑक्टोबर २०२१ सर्व रेल्वे स्थानकावर स्वच्छता सत्याग्रह, १जानेवारी २०२२ ला शकुंतला रेल्वेचा १०९ वाढदिवस, सर्व रेल्वे स्थानकावर साजरा केला, संत गाडगेबाबा जयंतीचे निमित्त साधून, सर्व रेल्वे स्थानकाची रंग रंगोटी करून, अचलपूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
आणि आता शहिददिनी एक लाख सह्या साठवा,शकुंतला रेल्वे वाचवा साक्षी इन्फोटेक अचलपूर येथे झाल, शकुंतला रेल्वे सत्याग्रहीच्या बैठकित स्वाक्षरी सत्याग्रहाचा निर्णय घेण्यात आला. यावेळी विजय विल्हेकर, योगेश खाजोडे, गजानन कोल्हे, मनोज पाटील, राजा धर्माधिकारी, राजेश अग्रवाल, संतोष नरेडी, कमल केजडीवाल, राजकुमार बरडीया, संजय डोंगरे, जनार्दन गावंडे, निलेश इखार, मुरलीधर ठाकरे, अनिल सोनपरोटे, गजानन देवके उपस्थित होते. स्वाक्षरी सत्याग्रहाचे सार्वत्रिक नियोजन व्हावें असे आव्हान ऍड कमलकांत लाडोळे मा, नगराध्यक्ष, आनंद संगई, बंडू हंतोडकर, प्रकाश बोनगिरे, बंडू शर्मा, रामदास चव्हाण, मालिनी पाटील, वर्षा अग्रवाल, जयश्री चव्हाण, नम्रता शहा, नीता वांदे यांनी केले आहे, १९ मार्च पासूनच स्वाक्षरी सत्याग्रहाला अचलपूर, अंजनगाव, मूर्तिजापूर, दर्यापूर येथे प्रारंभ झाला, नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. २३ मार्च शहिददिनी स्वाक्षरी अभियान सर्व ठिकाणी व्यापक प्रमाणात राविण्यात येईल. शेतकरी अन्नत्याग आंदोलनामध्ये सुद्धा उपस्थित सर्व शेतकऱ्यांनी स्वाक्षरी मोहीम मध्ये सहभागी होऊन सह्या दिल्या अशी माहिती युवा शेतकरी भाईने पाटील यांनी दिली.