दर्यापूर – महेश बुंदे
अमरावती वार्ता:- नजीकच्या कुंभारगाव, कोकर्डा वितरण केंद्रातील मुऱ्हादेवी ग्रामपंचायत येथे कृषी मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात शेतकरी, महसूल व वीज ग्राहक यांना संबोधित केल्या गेले.
त्यात कार्यकारी अभियंता अचलपूर व उपकार्यकारी अभियंता दर्यापूर उपविभाग यांच्या मार्गदर्शनात कृषी धोरण २०२० यात एकूण २२ ग्राहकांनी सहभाग घेऊन ३ लाख ५१ हजार रुपये गोळा करून महावितरण कंपनीला सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे आभार मानल्या गेले. सदर कार्यक्रमात उपस्थितांमध्ये कनिष्ठ अभियंता गणेश जाधव, कनिष्ठ अभियंता संदीप पवार, वरीष्ठ तंत्रज्ञ संदेश घोगरे, सुरज काकड, पंकज कैकाडी, शुभम कुरडकर राहुल कुराडे, गोलु नवले उपस्थित होते.

“कृषिपंपाचे वीजबिल आज भरू, उद्या भरू असे म्हणत महावितरणच्या कृषी वीज धोरणात ५० टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी आता केवळ ९ दिवस उरले आहेत. येत्या ३१ मार्चला ५० टक्के माफीची मुदत संपणार असून, एप्रिलपासून बिलात फक्त ३० टक्के माफी मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मुदत संपण्याची वाट न पाहता अभियानात सहभागी होऊन आपल्या कृषिपंपाची थकबाकी तसेच चालू बिले भरून ५० टक्के माफी मिळवावी तसेच वीजपुरवठा खंडित होण्याची नामुष्की टाळावी.”
चेतन मोहोकार
उपकार्यकारी अभियंता दर्यापूर
