सामाजिक उपक्रमाने शिवजयंती उत्साहात साजरी.

प्रतिनिधी आर.एन. माळी

पुणे वार्ता:- माझे, माझ्या गावाचे, माझ्या प्रांताचे, माझ्या देशाचे, माझ्या देशाच्या मानवतावादी धर्माचे अस्तित्व ज्यांच्या मुळे अबाधीत आहे आणि राहणार आहे असे युगपुरुष म्हणजे छत्रपती शिवराय. त्यांच्या जन्माचा हा सोनेरी दिवस (तिथीनुसार). मनाला उभारी देणारा आणि चैतन्य निर्माण करणारा हा दिवस. ज्यांची जयंती रोज साजरी करावी असे हे हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे एकमेवाव्दितीय राजे. याच दिवसाचे औचित्य साधून अखिल रुपीनगर तळवडे शिवसेना पक्षाच्या वतीने भव्य शिवजयंती महोत्सव आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमास रूपीनगर तळवडे येथील असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करत उपस्थित नागरिकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
शिवजयंती महोत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिर मध्ये मोठ्या प्रमाणात लोकांनी सहभाग घेतला.तसेच रक्तदात्यांचे प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करून त्यांचे आभार करण्यात आले.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!