अंजनगाव दर्यापूर मार्गावरील निंभारी ते कोकर्डा फाट्याच्या दरम्यान अज्ञात चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक ,एकजण जागीच ठार

अंजनगाव सुर्जी – महेश बुंदे

अंजनगाव दर्यापूर मार्गावरील निंभारी ते कोकर्डा फाट्याच्या दरम्यान रविवार दिनांक २० मार्च रोजी रात्री ९ वाजताच्या दरम्यान अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत मोटारसायकल गाडी नंबर दुचाकी चालक जागीच ठार झाला असून घटनेची माहिती रहिमापुर चिंचोली पोलीसांनी सोमवार दिनांक २१ मार्च रोजी सकाळी दिली. अंजनगाव दर्यापूर राज्यमार्गावर दिवसेंदिवस अपघाताची वाढती मालिका लक्षात घेता प्रशासन यासाठी कोणतीही उपाय योजना करतांना दिसत नाही. एक दोन दिवसानंतर या मार्गावर एक दोन अपघात घडत आहेत.अशातच रात्रीच्या सुमारास याच मार्गावर दोन अपघात घडले असून झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

काळू चिमाजी डोमाळे वय ३५ वर्ष रा. पिंपळखेडा ता. तेल्हारा हा इसम मेंढपाल असून कोकर्डा फाट्यावर मेंढीचा कळप घेवून राऊटीवर होता. रात्रीला मृतक हा दुचाकी क्र. वाहनाने निंभारी फाट्यावर पिण्यासाठी पाणी व गुटखा आणण्याकरिता गेला होता परत येत असताना निंभारी व कोकर्डा फाट्याच्या मधात अज्ञात चारचाकी वाहनाने मृतकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकी चालकाचा गाडीवरुन पडून डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

याची माहिती रहिमापूर चिंचोली पोलीस व युवा स्वाभिमान पार्टीचे उपजिल्हा प्रमुख अजय देशमुख व तोसीफ सौदागर यांना देण्यात आली, अजय देशमुख यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी रुग्णवाहिका पोहोचून मृतक काळू डोमाळे याला ग्रामीण रुग्णालय अंजनगाव सुर्जी येथे पोहचविले. मृतकावर शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आला. सदर घटनेचा पंचनामा एएसआय गजानन वर्मा व पोकाँ. उमेश नागदिवे यांनी केला. घटनेतील अज्ञात चारचाकी वाहनाचा शोध रहिमापूर चिंचोली पोलीस घेत आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!