प्रतिनिधी फुलचंद भगत :-
वाशिम:-भटकंती करणाऱ्या समाजातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कर्तव्य पलीकडे जाऊन ज्ञानदानाचे पवित्र काम पोलिस दलातील कार्यरत असणाऱ्या संगीता ढोले ह्या करत आहेत, त्यांच्या सामाजिक कार्याची विशेष दखल घेऊन आज कर्तव्यदक्ष व समाज कार्यात अग्रेसर असणाऱ्या वाशिम येथील महिला व बालविकास अधिकारी कु.प्रियंका गवळी यांनी आज 28 आक्टोम्बर रोजी आपला वाढदिवस अत्यंत समान उपयुक्त पद्धतीने या पालवरच्या शाळा बाह्य मुलासोबत साजरा करून आपल्या वाढदिवसावर अनाढाई खर्च न करता या मुलांना कडाक्याच्या थंडी पासून संरक्षण मिळावे म्हणून उबदार स्वेटर व टोप्या देऊन त्यांना कडाक्याच्या थंडीत मायेची ऊब दिली
