Post Views: 392
शिक्षक आघाडी कास्ट्राईब विभागीय कार्याध्यक्ष पदी अशोक तायडे,चांदूर रेल्वे तालुक्यातून होत आहे कौतुकांचा वर्षाव
चांदूर रेल्वे – (सुभाष कोटेचा.)
अमरावती जिल्हा शिक्षक आघाडीची कार्यकारणी नुकतीच जाहिर करण्सात आली असुन यामध्ये चांदूर रेल्वे येथील रहिवासी असलेले अशोक तायडे यांची शिक्षक आघाडी कास्ट्राईब विभागीय कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
शिक्षक आघाडी अमरावती जिल्हा पदाधिकारी यांची महत्वपूर्ण बैठक नुकतीच अमरावती शिक्षक मतदार संघाचे माजी शिक्षक आमदार तथा शिक्षक आघाडी संस्थापक अध्यक्ष प्रा. श्रीकांत देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व शिक्षक आघाडी विभागीय सरचिटणीस विलासराव राऊत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या बैठकीत दरम्यान विविध विषयांवर चर्चा करून नविन नियुक्ती जाहीर केली. यामध्ये शिक्षक आघाडी महिला अध्यक्षपदी निता गहेरवाल, शिक्षक आघाडी कास्ट्राईब विभागीय कार्याध्यक्षपदी अशोक तायडे, अमरावती जिल्हा कार्याध्यक्षपदी निलश पारडे, अमरावती जिल्हा उपाध्यक्षपदी सुनिल जिवतोडे, अमोल तट्टे, विजय झुडपे, अमरावती जिल्हा कास्ट्राईब अध्यक्षपदी सुधाकर खडसे, तिवसा तालुका अध्यक्षपदी प्रा. हर्षवर्धन बोके, धामणगांव रेल्वे तालुका अध्यक्षपदी कैलास चौधरी, चांदूर रेल्वे तालुका अध्यक्षपदी अनिल जिवतोडे, अचलपूर तालुका अध्यक्षपदी अतुल इंगळे यांची निवड करण्यात आली. तर विभागीय कार्याध्यक्षपदी निवड झालेले अशोक तायडे हे महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे विभागीय कार्याध्यक्ष सुध्दा आहेत हे विशेष. प्रत्येक शाळेतील प्रत्येक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या पर्यंत पोहचून त्यांच्या समस्या समजाऊन घेऊन त्या सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे अशोक तायडे यांनी म्हटले. निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.