पुणे वार्ता :- आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आता संपाचा हत्यार उगारले आहे. गुरूवारपासून राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी सेवेवर परिणाम झाला आहे.

त्यामुळे सामान्य प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. महागाई भत्ता २८ टक्के करण्यात यावा, दोन टक्क्यांवरून तीन टक्के वार्षिक वेतनवाढ करण्यात यावी. दिवाळीच्या आधी पगार देण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आता उपोषणाला सुरूवात केली आहे. राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.
या संपाला कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
कोरोना काळात सर्वाधिक भरडल्या गेलेल्या एस टी कामगारांची भूमिका समजावून घेत त्यांना योग्य न्याय मिळावा यासाठी आता विविध संघटनांचे सभासद असलेले एस टी कामगार एकत्र आले असून राज्यभर आंदोलन सुरू केले आहे.
पुण्यात स्वारगेट,शिवाजीनगर परिसरातील एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयाबाहेर संयुक्त कृती समितीतर्फे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलंय. राज्य सरकारने तातडीने मागण्या मान्य कराव्यात अन्यथा संप पुकारू, असा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिलाय.
आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. पुणेसह नाशिक, रत्नागिरी,कोल्हापूर, नागपूर, सोलापूर या ठिकाणी कर्मचारी आक्रमक झालेले पाहायला मिळत. ऐन दिवाळीच्या तोंडावर आंदोलन तीव्र झाल्यास याचा प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे.
या एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाची राज्य सरकार आणि परिवहन मंत्री अनिल परब दखल घेणार का? हे देखील पहावे लागणार आहे. सध्या राज्यभरात डेपोतील बस वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून केवळ पर जिल्ह्यातून आलेल्या बसेस परत पाठवल्या जात आहेत.

काय आहेत एस टी कर्मचा-यांच्या मागण्या
महागाई भत्ता देण्यात यावा
वार्षिक वेतनवाढ ही दोनवरून टक्क्यांवरून तीन टक्के करण्यात यावी.
घरभाडे भत्ता 8, 16, 24 % प्रमाणे देण्यात यावे.
दिवाळीपूर्वी वेतन मिळावे