पुणे :- खेड तालुक्यातील सिद्धेगव्हाण या गावातील सर्व नागरिकांना कोविशील्ड लसीकरण मोहीम घरोघरी जाऊन राबविण्यात आली. संपूर्ण गावातील नागरिकांचा पहिला लसीकरण डोस 100% पुण॔ करण्यात आला आहे. यामुळे खेड तालुक्यात गावातील सर्व नागरिकांना १००% लसीकरण करण्याचा मान सिद्धेगव्हाण या गावाने पटकावला आहे.
खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव उपकेंद्राअंतर्गत येणारे सिद्धेगव्हाण हे पहिले 100% लसीकरण करणारे गाव ठरले आहे.हि सर्व मोहीम गावात राबविण्यासाठी शेलपिंपळगाव प्राथमिक आरोग्य विभागाचे अधिकारी डाॅ.इंदिरा पारखे मॅडम लोकनियूकत आदर्श सरपंच साधनाताई चौधरी.,डाॅ.सौ.दुबे मॅडम सौ.छाया इंगळे मॅडम,आशा स्वयंसेविका सौ.सुवर्णा आरेकर, सादिक शेख सर उपसरपंच अशोक गंगावणे ग्रा. प .सदस्य निलेश चौधरी अशोक मोरे, नंदाताई गायकवाड, मोनिका गाडे व सर्व आरोग्य सेवक यांच्या अथक परिश्रमांतून हे यश मिळाले आहे.गावातील १८ वर्षापुढील तरुणांना व वृद्ध व्यक्तींना,महिलांना घरोघरी जाऊन सरपंच व आरोग्य सेवकांनी लसीचे डोस देण्यात आले. या मोहिमेला गावातील सर्व नागरिकांनी प्रतिसाद दिल्याने सिद्धेगव्हाण हे गाव तालुक्यात १००% पहिला डोस कोविड लसीकरण करण्यात ठरले आहे.