पुणे वार्ता :- मौजे-मोई, ता-खेड, जि-पुणे गावचे हद्दीत राहणारे (मगत) प्रविण रामदास गवारी व आरोपी महेश उर्फ बंटी जयपंत येळवंडे हे दोघे मित्र असुन मयत प्रविण रामदास गवारी हा दारुचे नशेमध्ये आरोपी महेश उर्फ बंटी येळवंडे याचे घरी जावून महेश याची पत्नी व आई यांना शिवीगाळ करीत होता, तसेच दि २३/१०/२०२१ रोजी ०२:०० वा आरोपी महेश उर्फ बंटी येळवंडे हा घरी नसताना (मयत) प्रविण रामदास गवारी हा आरोपी महेश यावे घरी गेला प तेथे आरोपी महेश याये ४ महिन्याचे मुलारा आरोपीचे पत्नीचे मांडीवरून ढकलुन देवुन आरोपीची पत्नी व आई यांना शिवीगाळ केली. त्याचा राग मनात धरून आरोपी महेश उर्फ बंटी जयवंत येळवंडे याने मिञ (मयत) प्रविण रामदास गवारी यास जिये तार मारण्याचे उद्देशाने दारू पाजण्याच्या बहाण्याने मोटार सायकलवरून मोई ते निघोजे जाणारे रोडने निर्जन ठिकाणी नेवुन तेथे (मयत) प्रविण रामदास गवारी यास दारू पाजुन त्यास लाकडी दांडक्याने हाता पायावर डोक्यावर मारहान करून त्याचा खून केला आहे..
चाकण पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नंबर-१३०८/२०२१ भा.द.वि. कलम ३०२ ३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. यातील आरोपीस लागलीच अटक करण्यात आली असून त्यास इतर कोणी मदत केली आहे काय ? याचा शोध सुरु आहे.
अटक आरोपी