महाळुंगे पोलीस चौकी कारवाई ,मोटार सायकल बनावट चावीच्या सहाय्याने चोरी करणा-या तीन आरोपीकडुन ३,२१,०००/- रुपये किंमतीचे एकुण १४ मोटार सायकल जप्त

पुणे वार्ता :- महाळुंगे पोलीस चौकी हद्दीमध्ये वाहन चोरीचे प्रमाण वाढल्याने मा. पोलीस आयुक्त सोो, पिंपरी चिंचवड यांनी आदेशित केल्याने त्यानुसार वारंवार गुन्हे घडणारे ठिकाणचे गुन्हे प्रवण क्षेत्र म्हणुन क्राईम मॅपिंग करण्यात आले त्यानुसार वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी तपास पथकाला वारंवार वाहन चोरी होणा-या ठिकाणाला ट्रॅप लावुन वाहन चोरी उघड आणणेबाबत आदेशित केले होते.

त्यानुसार स.पोनि गुळीग यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अंमलदारांनी वारंवार वाहन चोरी होणा या ठिकाणांना भेटी देवुन वाहन चोरी गुन्हे घडले तारीख, वेळ, ठिकाण यानुसार सीसीटिव्ही फुटेजची तपासणी सुरुवात केली त्याअनुशंगाने महाळुंगे पोलीस चौकी हदीतील २४५ सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करण्यात आली व गुप्त बातमीदारा मार्फत माहिती काढण्यास सुरुवात केली.

त्यानुसार मोटार सायकल चोरीच्या ठिकाणी प्राप्त माहितीनुसार वॅरॉक कंपनी महाळुगे येथे त्यानुसार तपास पथकातील सपोनि दत्तात्रय गुळीग पोहवा / चंद्रकांत गवारी, पोना / विठ्ठल बडेकर, पोना/संतोष काळे, अशांनी सापळा लावला असता बॅरॉक कंपनीच्या बाहेर एक संशयित इसम मोटार सायकलींच्या पाहणी करतांना मिळुन आला तपास पथक त्यावर वॉच करीत असतांना त्यास पोलीसांची चाहुल लागली त्यावेळेस तो त्या ठिकाणाहून पळून जावु लागला असता त्यास पाठलाग करून ताब्यात घेतले.

त्यांचेकडे सखोल चौकशी करता त्याने व त्याचा मित्र हा अमित गोपाल तायडे, रा. सदर व गोपाळ सुभाष कांडेलकर, वय २७ वर्षे रा. मेदनकरवाडी चाकण ता. खेड जि. पुणे याने महाळुंगे पोलीस चौकीस गुन्हे दाखल होते मोटारसायकल नं. एच १२ एल जी ६७३१ ही व्हेरॉक कंपनी, महाळुगे येथुन बनावट चाबीच्या सहाय्याने चोरी केली असल्याचे कबुल केले.

तोपर्यंत अमित गोपाल तायडे हा श्रीकांत चक्रनारायण यास पोलीसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाल्याने फरार झाला होता. त्याची माहिती मिळवून तांत्रिक तपास करून तो परभणी येथे जाणेचे बेतात असताना त्यास औरंगाबाद रेल्वे स्टेशन, औरंगाबाद येथुन रेल्वे मध्ये बसलेला असताना तपास पथकाने शिताफीने ताब्यात घेवून महाळुंगे पोलीस चौकी येथे आणुन सखोल चौकशी केली असता त्याचेकडुन गोपाळ सुभाष कांडेलकर, वय २७ वर्षे रा. मेदनकरवाडी चाकण ता. खेड जि. पुणे याचा देखिल वाहन चोरीमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास नाणेकरवाडी येथुन ताब्यात घेवून त्याचेकडे तपास करण्यात आला असता तपासादरम्यान ट्रॅव्हल्सच्या डिक्की मधुन गाडया यवतमाळ, बुलढाणा या ठिकाणी पाठविल्याचे निष्पन्न झाले त्यानुसार तपासा दरम्यान त्यांचेकडुन एकुण १४ मोटार सायकली वेगवेगळ्या ठिकाणावरून जप्त करण्यात आल्या आहेत.

वाहनचोरी करणारे अटक केले आरोपीची नावे – १) अमित गोपाल तायडे, वय २७ वर्षे, रा. व्दारकासिटी महाळुगे ता. खेड जि. पुणे, २) श्रीकांत हरिदास चक्रनारायण, वय ३१ वर्षे, रा. सिसका कंपनी समोर महाकुंगे ता. खेड (३) गोपाळ सुभाष कांडेलकर, वय २७ वर्षे रा. मेदनकरवाडी चाकण ता. खेड जि. पुणे

चोरलेली वाहन विकत घेणारे अटक आरोपी

१) राजेश्वर हिरासिंग चव्हाण, वय ४२ वर्षे, रा. कोहळा, पो. धामणगावदेव, ता. दारवा जि. यवतमाळ (२) गजानन रामचंद्र चव्हाण, वय ३५ वर्षे, रा. कोहळा, पो. धामणगावदेव, ता. दारवा जि. यवतमाळ ३) दुर्योधन श्रीराम चव्हाण, वय ४२, रा. कोहळा, पो.धामणगांव, ता. दारवा, जि. यवतमाळ ,४) मोहन ओमकार सपकाळ, वय ३२ वर्षे पो तालखेड ता. मोताळा जि. बुलढाणा.

जनतेला अवाहन याद्वारे एमआयडीसी मधील कंपन्यांना अवाहान करण्यात येते की आपल्या कामगारांच्या मोटार सायकली कंपनीच्या आवारात सिक्युरिटीच्या/ सीसीटीव्ही च्या निगराणी खाली लावण्यात याव्यात आणि सुजाण नागरिकांना अवाहान करण्यात येते की आपल्या मोटार सायकलींच्या सुरक्षेसाठी मेटल टायर लॉक चा वापर करावा जेणेकरून मोटार सायकल चोरीस आळा बसेल आणि मोटार सायकल चोरी झाल्याने आपणास होणा-या त्रासास प्रतिबंध निर्माण होईल.

सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश मा. अपर पोलीस आयुक्त श्री संजय शिंदे, मा.पोलीस उप-आयुक्त श्री. मंचक इप्पर, वय्यक पोलीस आयुक्त श्रीमती प्रेरणा कट्टे यांचे सुचना व मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक श्री अरविंद पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री दशरथ वाघमोडे, सहा पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, सपोनि सारंग चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक दिनेश चव्हाण, पो. अंमलदार पोहवा / चंद्रकांत गवारी, राजू कोणकेरी, राजू जाधव, अमोल बोराटे, अशोक जायभाये पोना/ विठ्ठल वडेकर, संतोष काळे, प्रितम ढमढेरे, श्रीधन इचके युवराज बिराजदार, किशोर सांगळे पोकों/ शिवाजी लोखंडे, शरद खैरे यांनी केली आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!