याला म्हणतात माणुसकी! मेळघाटात चक्क विषारी नागावर शास्त्रक्रिया करून दिले जीवनदान


अमरावती : धारणी शहर प्रादेशिक वनवृत्तांर्गत येणाऱ्या घनदाट जंगलाने व्यापलेला असून वन्यप्राण्यांसह ईतर दुर्मीळ जातीचे साप असतात. वस्त्यांमध्ये, निवासांमध्ये कोबरा, मण्यार, घोणस, धामन, पानधिवड यासारख्या विषारी अथवा बिनविषारी सर्पाचे आवागमन दिसून येते, त्यामुळे अमूक अमुक व्यक्तीस सर्प चावला ( स्नेकबाईट ) तो व्यक्त सर्पदंश होवून घटनास्थळी किंवा उपचारादरम्यान दगावला अशा घटना नेहमीच दिसून येतात.

परंतु, पक्ष्यांच्या थव्याकडून हल्ला चढवून गंभीर दुखापत केलेल्या सर्पास जखमी अवस्थेत चक्क दवाखान्यात नेवून उपचार पूरवून जीवदान दिल्याची घटना आम्ही तुम्ही क्वचित ऐकली असेल.अशीच एक अपवादात्मक, मात्र मानवी मनास रोमहर्षक उर्जा पुरवून शंभर टक्के खरी खूरी घटना नुकतीच धारणी शहरातून उघडकीस आली आहे.

धारणी शहरातील मुख्य वसाहत असलेल्या हरिहर नगरातील एका व्यावसायिकांच्या घरासमोर क्रोबा सर्प आणि चिमण्यांचा थव्यांमध्ये धंदयुद्ध सुरू असून त्यामध्ये क्रोबा सर्प हा गंभीर जखमी घडल्याची माहीती ‘स्नेक रेस्क्यू ईन मेळघाट’ याच्यापर्यंत संबंधितांकडून पुरविण्यात आली. स्नेक रेस्क्यू ईन मेळघाट या संस्थेचे कार्यकारी संचालक सर्पमित्र अमर खांडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांकडून एका क्षणाचा देखील विलंब न करता त्वरित घटनास्थळ गाठून त्या जखमी झालेल्या ‘कोब्रा’ ( सर्पास ) नागास तातडीने रेस्क्यू करण्यात आले.

रेस्क्यू केल्यानंतर सर्पमित्र अमर खांडेकर यांना असे जाणवले की, कोबऱ्यास ( नागला ) डाव्या डोळ्याजवळ चिमण्यांकडून रक्तबंबाळ करण्यात आले आहे. त्यामुळे जखमी अवस्थेत संबधीत सर्पावर उपचार पुरविणे अत्यावश्यक आहे, जखमी सर्पास उपचार न पुरविताच जंगलात सोडून दिले तर त्यास उदळ, मुंगळा, मुंग्यांपासून धोका पत्करू शकतो. परिणामी कोबऱ्याचा मृत्यू सुद्धा संभवतो, त्यामुळे सर्पमित्र अमर खांडेकर यांच्याकडून जखमी नागला धारणीच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात आणून त्यावर त्वरित वैद्यकीय औषधोपचार पुरविण्यात आले.

पशुवैद्यकीय दवाखान्यात सर्पमित्र अमर खांडेकर जखमी कोबऱ्यास स्टीकच्या मदतीतून व स्वतःच्या हातावर स्थिरपणे धरण्यात आले स्नेकतज्ज्ञ डॉ. सुनील फोले यांच्याकडून कोबऱ्याच्या जखमेवर ‘पिओडीन’ लावून ओषधोपचार पुरवून जीवदान देण्यात आला. त्यानंतर लगेच स्नेक रेस्क्यू टीमकडून सदर कोबऱ्यास वन्यप्राण्याचे अधिवास असलेल्या प्रादेशिक मेळघाट वनवृत्तांर्गत येणाऱ्या जंगलात नेवून सोडण्यात आले.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!