Post Views: 362
चांदूर रेल्वे: सुभाष कोटेचा-
अमरावती चांदुर रेल्वे :- मागील चार महिण्यांपासून मांजरखेड येथील सवर्णांकडून सततच्या अन्याय अत्याचाराने व त्यावर शासन व प्रशासनकडून ठोस कार्यवाही न झाल्याने व्यथीत झालेल्या दानापूरच्या ६० ते ६५ अनुसूचित जातीच्या लोकांनी २२ ऑक्टोबरला गाव सोडले होते.रविवारी सकाळी वंचित बहुजन महिला आघाडी उपाध्यक्ष प्रा.निशा शेंडे यांच्यासह अमरावती जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी दानापूर येथील पीडित गावकऱ्यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे असल्याचे सांगीतले.
रविवारी सकाळी वंचित बहुजन महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रा.निशा शेंडे,अमरावती जिल्हाध्यक्ष(पश्चिम) प्रा.शैलश गवई,जिल्हाध्यक्ष(पूर्व) अशोक मोहोड,अमरावती जिल्हा महासचिव प्रा.रवींद्र मेंढे,चांदूर रेल्वे वंबुमआच्या अध्यक्ष बेबीनंदा लांडगे,उपाध्यक्ष हिरू मेंढे,सचिव अनिता धवने,चांदूर रेल्वे तालुका उपाध्यक्ष रवींद्र वाहणे,चांदूर रेल्वे शहर अध्यक्ष प्रा.सतिश वानखडे,युवा आघाडी अध्यक्ष संदीप गवई,प्रेमचंद अंबादे,गजानन मोहोड,रवि कलाने यांनी दानापूर येथील पीडित अशोक मोहोड,सहादेव चांदणे,मंदा चांदणे निखील चांदणे,पुरूषोत्तम मोहोड यांसह सर्व पीडिताची भेट घेऊन त्यांची आपबिती जाणुन घेतले आणि त्यांना धीर दिला.दानापूरच्या पीडितांच्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम वंचित बहुजन आघाडीचे अमरावती जिल्हा महासचिव प्रा.रवींद्र मेंढे यांनी केले असुन अमरावती जिल्ह्यासह चांदूर रेल्वे तालुक्यातील वंचित बहुजन आघाडी,महिला व युवा आघाडी दानापूर गावकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे.अन्यायग्रस्त दानापूर गावकऱ्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी ते पाठपुरावा करणार आहे.