Post Views: 390
अ.भा. ग्रामीण पत्रकार संघाची अधिवेशन नियोजन बैठक,
राज्यातील जिल्हाध्यक्षांची उपस्थिती
प्रतिनिधी सुभाष कोटेचा :-
अमरावती:-अमरावती येथिल अत्याधुनिक हाॅटेल प्राईम पार्क मधील भव्य सभागृहात होणार्या अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाच्या आगामी राष्ट्रीय अधिवेशनासंबधीची नियोजन बैठक शनिवारी हाॅटेल प्राईम पार्क मध्ये पार पडली.यात संघटनेच्या राज्यभरातील केंद्रिय पदाधिकार्यांसह विदर्भ,मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र मधील संघटना प्रमुख व जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.या बैठकिच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर सुने तर प्रमुख अतीथी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष कैलासबापु देशमुख होते.बैठकीचे प्रास्ताविक संघाचे केंद्रिय सरचिटणीस सुरेश सवळे यांनी केले.
त्यांनी पत्रकारांच्या विविध समस्यांवर टाकला प्रकाश टाकला.व ग्रामीण पत्रकारांना शासनाकडून कायमस्वरुपी महिन्याकाठी मानधन देण्याची मागणीकरुन त्याचा संघटनेकडून पाठपुरावा करणार असल्याचे जाहीर केले.तर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष कैलासबापु देशमुख यांनी आगामी अधिवेशन,त्या निमीत्ताने प्रकाशित होणारी “भरारी”स्मरणीका,व कार्यालयीन दिनदर्शिकेच्या नियोजनाची माहिती दिली.आपल्या अध्यक्षीय मनोगतात केंद्रिय अध्यक्ष मनोहर सुने यांनी अधिवेशनात प्रमुख अतिथी म्हणून केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांना निमंत्रण दिल्याची माहिती देऊन अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सर्वांनी तन,मन,धनाने सहकार्य करण्याचे आवाहन केले.यावेळी केंद्रिय उपाध्यक्ष युसुफखान यांनीही मार्गदर्शन केले.यावेळी राज्यातील उपस्थित पदाधिकार्यांनी पत्रकारांच्या विविध समस्यांवर प्रकाश टाकण्यात आला.
या बैठकीत केंद्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे,केंद्रिय सचिव अशोक पवार, केंद्रीय कोषाध्यक्ष अशोक यावूल, सदस्य माणिक ठाकरे, मनोहर चरपे, मदन भाटे आदींची मंचावर उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी या संघटनेची माहिती आपल्या मनोगतातून दिली. अमरावती येथे होणाऱ्या अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाच्या राष्ट्रीय अधिवेशनाची माहिती दिली. व याबाबतचे नियोजन सुध्दा करण्यात आले.
या कार्यक्रमाचे संचालन महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रा. रवींद्र मेंढे यांनी केले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष संजय पोफळे, विदर्भ सरचिटणीस बाळासाहेब सोरगिवकर, विदर्भ प्रदेश अध्यक्ष संजय कदम, जिल्हाध्यक्ष प्रदीप जोशी , दिनेश भटकर, राजेंद्र ठाकरे, एस. एस. मोहोड, विजय तेलगोटे, रविंद्र तिराणीक, मदन शेळके, प्रमोद पांडे, रामराव वानरे, श्रीकृष्ण काकडे, अन्वर निंबेकर, सागर सवळे,शहजादखान, मदन शेळके , ओमप्रकाश कुऱ्हाडे, परमेश्वर स्वामी, अनिल साखरकर, मनिष खुने, राजीव शिवणकर, शहेजाद खान , सचिन ढोके यांसह अनेक पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
या बैठकीत पदाधिकार्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या यात अ.भा. ग्रामीण पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख पदी बाळासाहेब सोरगीवकर चांदुर रेल्वे, मराठवाडा उपाध्यक्ष पदी परमेश्वर स्वामी परभणी,पुर्व विदर्भ अध्यक्ष रविंद्र तिराणिक भद्रावती(चंद्रपुर), पश्चिम विदर्भ कार्याध्यक्ष पदी प्रमोद पांडे अकोला, परभणी जिल्हा अध्यक्ष पदी अन्वर लिंबेकर, बुलढाणा जिल्हा (घाटावरील) अध्यक्ष पदी श्रीकृष्ण काकडे जानेफळ, हिंगोली जिल्हा प्रभारी अध्यक्ष मदन शेळके,वाशिम जिल्हा कार्याध्यक्ष पदी अजय परसे,वृत्तपत्र विक्रेता संघ वाशिम जिल्हा अध्यक्ष श्याम अपूर्वा यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.या अधिवेशन नियोजन बैठकीला चंद्रपुर,हिंगोली,परभणी,सहराज्यातील इतर जिल्ह्यातील दीडशे पदाधिकारी उपस्थित होते.